MH13NEWS Network
तुळजापूर – शारदीय नवरात्र महोत्सव व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी स्वर्गीय राजेश कोठे मेमोरियल स्कूल, हगलूर येथे महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट मा. डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या वतीने राबविण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. कोठे यांच्या सामाजिक बांधिलकीतून सुमारे एक लाख भाविकांना दूध-खीर व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी, स्थानिक मंडळांचे कार्यकर्ते तसेच कोठे परिवारावर प्रेम करणारे अनेक सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमास संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली सर, श्री. अंदेवाडी आप्पा, माजी मुख्याध्यापिका मारपल्ली मॅडम, श्री. छत्रपती अवशेट्टी, श्री. अजिंक्य घोडके, श्री. सागर साळुंके, श्री. आनंद अंकम, श्री. श्यामप्रसाद गंजी, श्री. नितीन भिसे, श्री. सूर्यकांत जिंदम, श्री. सिद्धेश्वर कमटम, श्री. बाळकृष्ण इप्पाकायल, श्री. गोविंद चिंता, श्री. प्रवीण बट्टूल, श्री. सुनील पाचंगे, श्री. विनायक खरात तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीने यापूर्वीही गरजूंसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरे, पूरग्रस्तांना अन्नधान्य सहाय्य, बेघरांसाठी शाली-ब्लॅंकेट वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.