सोलापुरातील आयएमसीचा प्रमुख CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..
सोलापूर / प्रतिनिधी सोलापुरातील एमआयडीसी चिंचोली या ठिकाणी आय एन सी लिमिटेडच्या माध्यमातून चालवला जाणारा शहरातील प्रमुख CNG पंप आज मंगळवारपासून बंद असल्याचे दिसून आले आहे. कंपनीने कालच नोटीस फलक लावून २ डिसेंबरपासून पंप बंद राहणार असल्याची माहिती दिली होती. यामुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

पंप बंद असल्याने CNG वाहनधारक मोठ्या गैरसोयीला सामोरे जात आहेत.

CNG भरण्यासाठी रांगेत होणारी अरेरावी, वाढती कटकट आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याच कंपनीच्या स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंपावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंप बंद ठेवल्याचेही समजते.

याबाबत कंपनीच्या प्लांट मॅनेजर यांनी आजपासून CNG पंप बंद असल्याचे सांगितलं याबाबत आणखी माहिती उपलब्ध करून थोड्याच वेळात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले







