MH 13News Network
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर पासून मध्यरात्री बारा वाजता उपोषणास बसणार आहेत. मराठा समाज बांधवांचा त्यांच्या उपोषणाला मोठा विरोध होतोय तरी जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
सरकारकडे या आहेत प्रमुख मागण्या..
सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी
हैदराबाद गॅझेट लागू करावे
सातारा गॅझेट लागू करावे
बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करावे
मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे
अशा प्रमुख मागण्या सरकारकडे मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.
जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनामुळे लाखो मराठा समाजाला कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे नोंदणी प्राप्त समाज बांधव हे ओबीसी आरक्षणासाठी पात्र झाले आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनुसार सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी झाल्यास त्याचा उपयोग उर्वरित लाखो समाजबांधवांना होईल असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे.
मध्यंतरी झालेल्या बैठकीत पाटलांच्या उपोषणाला समाज बांधवांनी मोठा विरोध केला होता. परंतु माझा जीव गेला तरी बेहत्तर परंतु समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणारच यावर पाटील ठाम होते.
दरम्यान, आज सोमवारपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण स्थळी रात्री बारापासून उपोषणास सुरुवात होणार आहे.