MH 13 News Network
सोलापूरचे पालकमंत्री, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.

मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अंतिम दर्शन आज दिनांक २५ फेब्रुवारी सकाळी ११ :०० ते ४:०० वाजेपर्यंत बोराटवाडी येथील निवासस्थानी होणार आहे.तर अंत्यविधी बोराटवाडी ता. माण जिल्हा सातारा येथे आज दुपारी ४ वाजता होणार आहे.
Jaykumar Gore bhagwanrao gore