Monday, February 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व निवासस्थानाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत -डॉ.पी. पी. वावा

MH13 News by MH13 News
1 year ago
in Blog
0
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व निवासस्थानाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत -डॉ.पी. पी. वावा
0
SHARES
15
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य डॉ. पी. पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सोलापूर सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न हे आरोग्य व निवासस्थानाचे असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील सर्व सफाई कर्मचारी यांची नियमित आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी. वावा यांनी दिले.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य श्री. वावा यांनी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, श्री वीरेंद्र नाथ सामाजिक सल्लागार, श्री संदीप चव्हाण,व अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, सहायक आयुक्त जिल्हा नगर प्रशासन अधिकारी विना पवार, सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे, महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार , उपायुक्त आशिष लोकरे, शिक्षणाधिकारी(प्राथमिक) कादर शेख, समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, पोलीस विभागाचे राजन माने, तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी तसेच सफाई कामगार तक्रार निवारण समितीचे सदस्य खज्जप्पा दादनवस, श्री. वाळुंजकर, सायमन गट्टू , श्रीनिवास रामगल, बाली मंडेपु आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. वावा यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांना मिळेल यासाठी संबंधित प्रमुखांनी दक्षता घ्यावी. एक ही सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत. सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. तसेच मेडिक्लेम योजनेचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी जिल्ह्यातील बँकामार्फत प्रयत्न करावेत असेही त्यांनी सुचित केले.

सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या घरांच्या योजनेबाबत आढावा घेण्यात आला. तसेच सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांबाबत, सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच त्यांना हॅपिटायटीस बी इंजेक्शन याबाबत माहिती देण्यात आली तसेच सी एस आर फंडामधून बँकांनी सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या उपचारासाठी पैसे देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी बँकाना पत्र देण्यात यावे.

तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून काही पैसे कापून त्यांना मेडिक्लेमसाठी कार्ड देण्यात यावेत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या महिलाना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत त्यांना चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, स्वतंत्र शौचालय तसेच महिला तक्रार निवारण समिती याबाबतच्या मागण्यांचा विचार करून ज्या ठिकाणी या सुविधा मिळत नाहीत त्या देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन व सेवा पुस्तके अद्यावत करण्याबाबत आढावा घेण्यात आला सफाई कर्मचाऱ्यांना रमाई आवास योजना तसेच पंतप्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचे अनुदान वाटप मंजूर करण्याबाबत आढावा घेण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक लाभाबाबत आढावा घेतला.

जिल्हाधिकारी होणार आशीर्वाद केंद्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती बैठकीत दिली. तसेच प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत संवेदनशील असून सर्व शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मिळण्यासाठी महापालिका व नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाबाबत नियुक्ती त्यांची माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. जिल्हा नगर प्रशासन सहाय्यक आयुक्त विना पवार यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील नगरपरिषदा तसेच महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्षपदी पुनश्च डॉ. गजानन कोटेवार

Next Post

थरार क्रिकेटचा |सोलापूर मीडिया चषकावर ’डिजिटल’ची मोहोर

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
थरार क्रिकेटचा |सोलापूर मीडिया चषकावर ’डिजिटल’ची मोहोर

थरार क्रिकेटचा |सोलापूर मीडिया चषकावर ’डिजिटल’ची मोहोर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.