# mh13news.com ## Posts - [महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://mh13news.com/maharashtra-is-the-powerhouse-of-indias-future-chief-minister-devendra-fadnavis/): mh 13 news network पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणुकींचे १९ सामंजस्य करार धरा लाख रोजगार संधी, आयटी, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक गतवर्षीच्या टप्पा ओलांडून, यंदा विक्रमी गुंतवणुकीचा विश्वास दावोस, दि. २० : –  भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री श्री.फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या […] - [कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱](https://mh13news.com/karachi-shaken-gul-plaza/): MH 13 NEWS NETWORK कराचीतील ‘गुल प्लाझा’ आगीत मृत्यूचे तांडव; २६ ठार, ८१ बेपत्ता पाकिस्तानमधील कराची शहरातील एम.ए. जिन्ना रोडवरील प्रसिद्ध ‘गुल प्लाझा’ शॉपिंग मॉलला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली असून ८१ नागरिक अद्याप बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच संपूर्ण बहुमजली व्यावसायिक इमारत धुराच्या आणि ज्वाळांच्या विळख्यात सापडली. मॉलमध्ये असलेली दुकाने, कार्यालये आणि गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अनेक लोक आत अडकून पडल्यामुळे बचावकार्य मोठ्या अडचणींमध्ये सुरू आहे. बचाव व शोधमोहीम युद्धपातळीवरघटनेची माहिती […] - ['जय' 'देव' करणार का "नानां"चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची "साथ"..!!](https://mh13news.com/high-voltage-ward-7-victory-changes-the-equation-nana-kalens-name-discussed-for-the-post-of-approved-corporator/): हाय व्होल्टेज प्रभाग ७ : विजयाने बदलले समीकरण, स्वीकृत नगरसेवकपदासाठी नाना काळेंच्या नावाची चर्चा सोलापूर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हाय व्होल्टेज प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे व उत्तरचे आमदार देशमुख यांनी प्रतिष्ठेचा बनवलेल्या या प्रभागात पराभव झाल्याने दोन्ही आमदारांसमोर नवे राजकीय समीकरणे बनवण्याची वेळ आली आहे.शहरात सर्वत्र भाजपाचे कमळ जोमाने फुलले असताना, पश्चिम भागातील पत्रा तालीम परिसरात भाजपाला धक्का बसला. मात्र, याच भागातील प्रभावशाली नेते व भाजपाचे उमेदवार पद्माकर ऊर्फ नाना काळे यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. प्रभाग ७ मधील […] - [मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..](https://mh13news.com/mobile-deposit-booths-are-not-possible-outside-the-polling-station/): मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष उभारणे शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे सोलापूर महानगरपालिकेचे आवाहन सोलापूर — सोलापूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, स्थानिक परिस्थिती तसेच उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल फोन जमा करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारणे शक्य होणार नसल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतदारांनी मतदानासाठी येताना शक्यतो मोबाईल फोन सोबत आणू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एखाद्या अपरिहार्य कारणास्तव मतदार मोबाईल फोन सोबत आणल्यास, तो मोबाईल फोन मतदान केंद्राबाहेर सुरक्षित ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मतदाराची राहील. मोबाईल फोन हरवणे, चोरी होणे किंवा नुकसान […] - [जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ](https://mh13news.com/district-council-and-panchayat-committee-general-election-schedule-announced-process-to-begin-from-january-16/): mh 13 news network राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार निवडणूक प्रक्रियेला दि. १६ जानेवारी २०२६ पासून सुरुवात होणार असून, संपूर्ण प्रक्रिया आयोगाने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना दि. २१ जानेवारी २०२६ पर्यंत आपले उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठरविण्यात आलेल्या वेळेत करण्यात […] - [पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!"](https://mh13news.com/immediate-action-on-the-seven-step-slope-at-ballari-chawla-by-the-district-collector/): mh 13 news network भाजप उमेदवार गणेश वानकर यांच्या विनंतीवरून भेट ! सोलापूर – ( प्रतिनिधी ) – प्रभाग ६ मधील बल्लारी चाळीमधील घरे सातबारा उताऱ्यावर येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.पालकमंत्री गोरे हे सोमवारी सायंकाळी प्रभाग सहा मधील भाजप उमेदवार व पॅनल प्रमुख गणेश वानकर, सुनील खटके,सोनाली गायकवाड आणि मृणमयी गवळी यांच्या प्रचारासाठी प्रभागात आले होते. पॅनल प्रमुख व भाजप उमेदवार गणेश वानकर यांच्या विनंतीवरून पालकमंत्री गोरे यांनी बल्लारी चाळ येथील बसवेश्वर हौसिंग सोसायटीला भेट दिली. यावेळी रहिवाशांनी चाळीमधील अडचणी सांगत चाळीमधील घरे सातबारा उताऱ्यावर येण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहत आहोत,कोणाचेही लक्ष नाही,आपण जातीने […] - [सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद](https://mh13news.com/solapur-shri-siddheshwar-maharaj-yatra-akshata-ceremony-drone-visual-delight/): सोलापूर शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने पुण्य पावन झालेल्या सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात आयोजित अक्षता सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ड्रोनद्वारे टिपलेले अत्याधुनिक हवाई फोटो, ज्यातून संमती कट्टा परिसरातील भक्तांचा मोठा संगम, पालखी व योगदंड, नंदीध्वज व भक्तीमय वातावरणाचे संपूर्ण दृश्य कॅप्चर करण्यात आले आहे. ड्रोन फोटोंमध्ये अक्षताचा वर्षाव करताना भक्तांच्या बाराबंदी वेशातील भक्तांचा अद्भुत संयोग स्पष्ट दिसत आहे. सोहळ्यास उपस्थित होते: ड्रोन फोटोमध्ये या सर्व उपस्थितांचे भक्तिभाव, पारंपरिक विधी व मंदिराच्या परिसरातील शांती आणि श्रद्धा स्पष्ट दिसून येते. या अद्वितीय दृश्यामुळे अक्षता सोहळ्याचा धार्मिक आनंद अधिक सजीवपणे अनुभवता येतो. अक्षता सोहळा पारंपरिक […] - [भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”](https://mh13news.com/festival-of-devotion/): MH 13 NEWS NETWORK शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने पुण्य पावन झालेल्या सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर येथे यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला अक्षता सोहळा संमती कट्टा येथे मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. संमती कट्टा येथे दरवर्षी परंपरेनुसार राजदंड व कुंभार कन्या यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या मंगल सोहळ्याची सुरुवात पारंपरिक विधींनी झाली. प्रथम पालखी व योगदंडाचे संमती कट्ट्यावर आगमन झाले. त्यानंतर नंदीध्वजाचे आगमन झाल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. यानंतर गंगापूजा व सुगडीपूजन विधी संपन्न झाले. धार्मिक परंपरेनुसार सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर अक्षता सोहळ्यास विधिवत सुरुवात करण्यात आली. अक्षतांचा वर्षाव होत असताना “जय सिध्देश्वर”च्या जयघोषाने […] - [नायलॉन मांजा बाळगला तर थेट २.५० लाखांचा दंड! विक्रेत्यांसाठी कडक इशारा”](https://mh13news.com/strict-warning-for-sellers/): mh 13 news network नायलॉन मांजा वापरणाऱ्या मुलांच्या पालकांना २५ हजार रुपयांचा दंड; उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश नायलॉन मांजामुळे जीवघेणे अपघात व यात निष्पाप लोकांसह पक्षांचे पडणारे बळी लक्षात घेता  मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यास 2 लाख 50 हजार रुपये दंड आणि नायलॉन मांजा वापरणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी दिले. अल्पवयीन मुले आढळल्यास त्यांच्या बाबतीत हा दंड त्यांच्या पालकांकडून वसूल केला जाईल. याचबरोबर हा दंड प्रत्येक वेळी झालेल्या उल्लंघनासाठी आकारण्यात येईल, असे न्यायालयीन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दंड स्वरुपात वसूल […] - [मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”](https://mh13news.com/january-15-is-a-holiday-for-industries-and-factories/): mh 13 news network राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आल्याचा शासन निर्णय उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, शैक्षणिक तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या सर्व कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश आस्थापनांना देण्यात आले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या […] - [“त्यागाला वंदन… माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूरच्या चार हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन](https://mh13news.com/salute-to-sacrifice/): mh 13 news network सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यलढ्यात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सोलापूरच्या चार हुतात्मे — हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा किसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे व हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन — यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते चारही हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्याग, शौर्य व राष्ट्रनिष्ठेला उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रदेश सचिव राहुल वर्धा, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे, शकील मौलवी, राजन कामत, रुस्तुम कंपली, माजी […] - [सत्तेसाठी नाही, विकासासाठी लढत!” – हर्षवर्धन सपकाळ यांचे काँग्रेस–महाविकास आघाडीला समर्थन](https://mh13news.com/support-for-the-maha-vikas-aghadi/): mh 13 news network प्रभाग १६ व २० मध्ये पदयात्रा; खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोलापूर दौऱ्यावर येत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप लोकशाहीचा गळा घोटत असून “पैसा फेका, तमाशा दाखवा आणि निवडणूक जिंका” हेच त्यांचे सध्याचे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिका निवडणूक ही शहरातील मूलभूत सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांवर होणे अपेक्षित असते. मात्र सत्ताधारी विकासावर बोलण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करत असल्याचे सपकाळ म्हणाले. पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, उद्याने, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यांसारखे नागरिकांचे दैनंदिन प्रश्न बाजूला सारले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसने […] - [“शेरो-शायरीच्या तोफेतून सत्ताधाऱ्यांवर घणाघात! खासदार इम्रान प्रतापगडींचे जोरदार आवाहन”](https://mh13news.com/mp-imran-pratapgads-strong-appeal/): mh 13 news network सोलापूर – सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस–महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सुप्रसिद्ध शायर व खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या जाहीर सभा रविवारी सोलापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या सभांमधून त्यांनी शेरो-शायरीच्या माध्यमातून केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. या प्रचार सभांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाहीर सभा सायंकाळी जिंदा शहा मदार चौक, बाशा पेठ तसेच ताश्कंद चौक, शास्त्री नगर येथे आयोजित करण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित […] - [सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक अखेरच्या टप्प्यात – सत्ता कुणाची? श्वास रोखणारी लढत!”](https://mh13news.com/whose-power-a-breathtaking-battle/): mh 13 news network मतदान यंत्र वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतिम टप्प्यात पोहोचली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील मतदान यंत्र वितरण केंद्र, स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान मतदान यंत्रांचे वितरण ऑन-कॅमेरा पद्धतीने व कडक पोलीस बंदोबस्तात होत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. तसेच स्ट्रॉंग रूममधील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही […] - [प्रभाग ६ मधील चाळीचा सातबारा प्रश्न मार्गी लावणार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची स्पष्ट ग्वाही](https://mh13news.com/the-chali-saatbaara-issue-in-ward-6-will-be-resolved-guardian-minister-jayakumar-gores-clear-assurance/): MH13NEWS सोलापूर – (प्रतिनिधी)प्रभाग क्रमांक ६ मधील बल्लारी चाळीतील घरे सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश दिले जातील, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप उमेदवार व पॅनल प्रमुख गणेश वानकर यांच्या विनंतीवरून त्यांनी बल्लारी चाळ येथील बसवेश्वर हौसिंग सोसायटीला भेट देत रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. सोमवारी सायंकाळी पालकमंत्री गोरे हे प्रभाग सहा मधील भाजप उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, सोनाली गायकवाड व मृणमयी गवळी यांच्या प्रचारासाठी प्रभागात आले होते. यावेळी बल्लारी चाळीतील नागरिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातबारा उताऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत, याबाबत ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली.रहिवाशांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री गोरे यांनी जागेवरच निर्णयात्मक […] - [जिजाऊंच्या विचारांतून जन्मले स्वराज्य; जननीच्या स्मृतींना गौरवपूर्ण सलाम](https://mh13news.com/a-respectful-tribute-to-the-memories-of-the-mother/): MH 13 NEWS NETWORK जिजामाता जयंती 2026 | स्वराज्याची जननी, संस्कारांची शिल्पकार, शिवरायाची प्रेरणा आज आपण केवळ एका महान मातेला नव्हे, तर एका युगपुरुषाला घडवणाऱ्या विचारांना आणि संस्कारांना नमन करण्याचा दिवस साजरा करत आहोत. जिजाऊ माँसाहेब – स्वराज्याची जननी, संस्कारांची शिल्पकार आणि हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीची पहिली शिलेदार – यांचा गौरव आजही प्रत्येकाच्या हृदयात दडलेला आहे. ज्या काळात स्त्रीला घराच्या चौकटीतच बांधले जात होते, त्या काळात जिजामातांनी शिवबांना तलवार चालवायला शिकवलं आणि मनात सत्य, न्याय, धर्म आणि माणुसकीचे धडे रोवले. सिंहासनाचे स्वप्न दाखवले, पण त्यावर बसताना प्रजेच्या दुःखाचे ओझे समजून घेण्याचा विचारही शिकवला. जिजामातांच्या संस्कारांतून घडलेला छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक […] - [श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ | प्रशासन व मंदिर समितीने समन्वयातून सुविधा द्याव्यात : भाविकांची अपेक्षा](https://mh13news.com/the-administration-and-the-temple-committee-should-coordinate-to-provide-facilities/): MH 13 NEWS NETWORK श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ साठी प्रशासन सज्ज; भाविकांच्या सुरक्षितता व सुविधांवर भर – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहरात दिनांक १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या श्री सिद्धेश्वर महायात्रेसाठी प्रशासन, सोलापूर महानगरपालिका व श्री सिद्धेश्वर मंदिर समितीने परस्पर समन्वयातून काम करून भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा २०२६ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, विना पवार, शहर पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, इन्सिडेंट कमांडर तथा शहर अभियंता […] - [ब्रेकिंग | पंढरपूर हादरलं! अहिल्या पुलावर कंटेनरचा मृत्यूतांडव; 2 ठार, 8 जखमी.](https://mh13news.com/container-tragedy-on-hillya-bridge-2-dead-8-injured/): MH 13 NEWS NETWORK ब्रेकिंग न्यूज | पंढरपूर : अहिल्या पुलावर भीषण अपघात; कंटेनर ट्रॅक्टर-ट्रॉलीवर आदळला, दोन ठार, आठ जखमी पंढरपूर शहरातील अहिल्या पुलावर आज भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या एका कंटेनरने ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून नागरिक प्रवास करत असताना मागून आलेल्या कंटेनरने नियंत्रण सुटल्याने ट्रॉलीला धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ट्रॉली उलटून रस्त्यावर पलटी झाली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. काही जण ट्रॉलीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन […] - [भीमशक्ती ऑन अ‍ॅक्शन! देगावमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ जबरदस्त शक्तीप्रदर्शन](https://mh13news.com/massive-show-of-strength-in-support-of-the-candidates/): mh 13 news network प्रभाग ६ : देगावमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ भीमशक्ती एकवटली विकासाच्या अजेंड्यावर भाजपच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार सोलापूर – (प्रतिनिधी) सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपचे पॅनल प्रमुख उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसांपासून आक्रमक प्रचार सुरू असून, होम-टू-होम संपर्कामुळे नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी देगाव येथे भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने भीमशक्ती एकवटली. देगावमधील भीमनगर येथे समाज मंदिरात तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना करण्यात आली. यानंतर झालेल्या बैठकीत भीमनगरातील भीमगर्जना तरुण […] - [प्रभाग सात | ‘सुमित’चा चकित करणारा प्रचार पॅटर्न; पारंपरिक राजकारणाला नवी दिशा](https://mh13news.com/a-new-direction-for-traditional-politics/): mh 13 news network प्रभाग ७ मध्ये घराघरांत संवादातून विश्वास निर्माण.. सोलापूर – (प्रतिनिधी) सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अधिकृत उमेदवार सुमित गणपत भोसले यांनी शांत, नियोजनबद्ध आणि परिणामकारक असा प्रचार पॅटर्न अवलंबला असून त्याचा प्रभाव थेट मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. गाजावाजा टाळत थेट संवादावर भर देणाऱ्या या प्रचार पद्धतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून विरोधकही चकित झाल्याचे चित्र आहे. “जय सद्गुरू” म्हणत आणि “एकदा संधी द्या, एकदा आशीर्वाद द्या” या साध्या पण प्रभावी शब्दांत सुमित भोसले यांनी होम-टू-होम प्रचाराला गती दिली आहे. प्रभाग ७ मधील ४० प्लॉट, हिंदू रक्षक […] - [पाण्यातून प्रकटले भक्तीचे तेज; सिद्धरामेश्वरांच्या कमरी कोळ्ळ रूपाची अलौकिक अनुभूती](https://mh13news.com/an-extraordinary-feeling-of-a-slender-waist/): mh 13 news network सोलापूर, दि. 12- ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यांच्या चरित्रातील महत्त्वपूर्ण घटना असलेल्या श्रीगिरी पर्वतावरील कमरी कोळ्ळ (दरी) येथे घडलेल्या बालक सिध्दरामेश्वर आणि श्रीशैल मल्लिकार्जुन यांच्या भेटीचा प्रसंग असलेला कमरीकोळ्ळ पुतळा सिध्दरामेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आला आहे. श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह देवस्थानच्या विश्वस्तांनी या पुतळ्याची पाहणी केली. आपले आराध्य दैवत मल्लिकार्जुन यांच्या भेटीच्या ओढीने बालक सिध्दराम श्रीगिरी -श्रीशैल पर्वतावर गेले. परंतु, साकार रूपात मल्लिकार्जुन देवास सदेह भेटण्यासाठी त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, मल्लिकार्जुन भेटले नाही. अखेर मल्लय्या मल्लय्या अशी आर्त हाक देत बालक सिध्दराम श्रीशैल डोंगरावरून कमरी दरीत उडी घेत असतानाच साक्षात मल्लिकार्जुन देवाने […] - [काळाच्या पाऊलखुणा : भारतातील सर्वात मोठे दगडी चक्रव्यूह आणि खडकीचे २००० वर्षांचे गूढ](https://mh13news.com/the-2000-year-old-mystery-of-khadki/): mh 13 news network इंट्याक सोलापूर वतीने हेरिटेज वॉक – वारसा फेरीचे आयोजन* *निसर्ग, भूगर्भशास्त्र आणि इतिहासाचा त्रिवेणी संगम; खडकीतील चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक ‘ ची शासनाकडे साद!* जानेवारी २०२६: भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास (INTACH)- इंट्याक सोलापूर शाखेच्या वतीने, सोलापूरच्या भूमीत सुप्त असलेल्या ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नियमित ‘वारसा फेरी’ (Heritage Walk) आयोजित येते असते. नुकत्याच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील आढळून आलेल्या भारतातील सर्वात मोठा चक्रव्यूह, ज्याचे दोन हजार वर्षाचे गूढ हे अभ्यासण्यासाठी व समजून घेण्यासाठी इंट्याक सोलापूर वतीने अद्वितीय वारसा फेरी रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजता संपन्न झाली. […] - [१२ जानेवारी – सोलापूर हुतात्मा दिन](https://mh13news.com/12-january-solapur-martyrs-day/): mh 13 news network सोलापूर | प्रतिनिधी – सोलापूरचे चार हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिश सरकारने फाशी दिली. स्वातंत्र्यलढ्यातील या महान क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ सोलापुरात हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो. ज्यांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशी देण्यात आली; त्यांनी १९३० मध्ये सोलापूरला तीन दिवसांसाठी (९ ते ११ मे) ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र केले होते, म्हणून १२ जानेवारी हा दिवस सोलापुरात ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो . - [बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय!](https://mh13news.com/victory-to-siddheshwar-maharaj/): mh 13 news network श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा! सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा प्रारंभ झाला असून यात्रेसाठी हजारो भक्तगण सोलापूर नगरीत दाखल होत आहेत. सर्व भाविक – भक्तांचे सोलापूरच्या पावन नगरीत मनःपूर्वक स्वागत. श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा! @top fans MH 13 NEWS #सोलापूर#Solapur#श्रीशिवयोगीसिद्धेश्वरमहाराज #गड्डा_यात्रा - [प्रभाग क्रमांक ५ हादरला; वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला उस्फूर्त प्रतिसाद, सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली..!](https://mh13news.com/the-ruling-party-has-grown-more-anxious/): mh 13 news network सोलापूर | प्रतिनिधी सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. पौर्णिमा हरिजन यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राजकीय वातावरण तापले असून, पारंपरिक पक्षांची गणिते बिघडण्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रचारादरम्यान जनतेशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका आणि सामाजिक न्याय, मूलभूत सुविधा, महिला-सशक्तीकरण व तरुणांसाठी संधी निर्माण करण्यावर दिलेला भर यामुळे मतदारांमध्ये सौ. हरिजन यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. झोपडपट्टी, महिला बचत गट आणि तरुण मतदारांमध्ये विशेषतः मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. “प्रभागातील मूलभूत प्रश्न – पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि स्वच्छता – यावर प्राधान्याने काम […] - [संस्कृती अशी की मन खुशाल; मराठी मेजवानीने दिला सुखद धक्का!” – भरत जाधव](https://mh13news.com/the-marathi-feast-gave-a-pleasant-surprise-bharat-jadhav/): MH 13 NEWS NETWORK महाराष्ट्र सदनात मकर संक्रांती महोत्सव, हुरडा पार्टीचे उद्घाटन नवी दिल्ली, दि. 10 : एक कलाकार म्हणून कला आणि आपल्या संस्कृतीविषयी बोलताना मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त न करण्याजोगा असतो. महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच असा अनुभव घेताना मला मनापासून समाधान वाटत आहे. दिल्लीसारख्या महानगरात, जिथे विविध प्रांतांचे लोक येतात, तिथे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची चव पोहोचवणे हे अभिमानास्पद कार्य आहे, अशा शब्दांत लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी दिल्लीतील मराठी संस्कृती संवर्धनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित ‘मकर संक्रांती महोत्सव’ व ‘हुरडा पार्टी’चे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर निवासी आयुक्त तथा सचिव […] - [सोलापूरच्या राजकारणात भूकंप! काडादी–गोरे भेटीने समीकरणे कोलमडली”](https://mh13news.com/earthquake-in-solapur-politics/): MH 13 NEWS NETWORK पालकमंत्री जयकुमार गोरे यांची धर्मराज काडादी यांच्याशी ‘मास्टरस्ट्रोक’ भेट महापालिका निवडणुकीत साथ देण्याचा काडादी यांचा स्पष्ट शब्द सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. शुक्रवारी गंगा निवास येथे झालेल्या या भेटीत गोरे–काडादी यांच्यात निवडणूक रणनिती आणि शहराच्या भविष्यासंदर्भात सखोल चर्चा झाली. या भेटीत धर्मराज काडादी यांनी महापालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचा शब्द दिला, ही बाब सध्याच्या राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीवेळी आमदार सचिन […] - [“वेतन रखडले, संयम सुटला! जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचा भडका; मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात हालचाली”](https://mh13news.com/movements-in-the-chief-ministers-office/): MH 13 NEWS NETWORK मिलिंद भोसले यांच्या पुढाकाराने सरकारवर दबाव वाढला सोलापूर : प्रतिनिधी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या सुमारे १६०० कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे वेतन प्रलंबित असल्याने राज्यभर तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नाला वाचा फोडत कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे थेट धाव घेतली असून प्रशासनावर दबाव वाढवला आहे. आज सोलापूर येथे राज्य पाणी व स्वच्छता कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड व कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी शिष्टमंडळासह मिलिंद भोसले यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गंभीर […] - [प्रभाग ११ मध्ये कोठे–कल्याणशेट्टी जोडीची जादू; विकासाच्या शब्दांनी लिंगायतबहुल भागात जल्लोष!”](https://mh13news.com/celebration-in-the-lingayat-majority-region-with-words-of-development/): MH 13 NEWS NETWORK राजीव नगर सभेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद; भाजप उमेदवारांसाठी उत्स्फूर्त पाठिंबा सोलापूर : प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ११ मधील राजीव नगर परिसरात झालेल्या जाहीर सभेत आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांच्या भरीव विकासाच्या अभिवचनांनी नागरिकांची मने जिंकली. लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या या भागात झालेल्या सभेला नागरिकांची मोठी गर्दी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभाग क्रमांक ११ मध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यासाठी १२ कोटी रुपयांची कामे मंजूर असून त्यातील ९ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्ष सुरू असल्याची माहिती देत दोन्ही आमदारांनी भविष्यातही प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा शब्द दिला. या घोषणेमुळे सभास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह संचारला. यावेळी व्यासपीठावर आमदार […] - [“ब्रेकिंग: मुख्यमंत्री फडणवीसांची सभा सोलापूर निवडणुकीचा गेमचेंजर!” – जयकुमार गोरे](https://mh13news.com/chief-minister-fadnaviss-rally/): mh 13 news network हरीभाई देवकरण मैदानावर 50 फूट स्टेज, भगवा पडदा, हजारोंच्या बैठकीची व्यवस्था सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 10) होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा या निवडणुकीतील निर्णायक टर्निंग पॉईंट ठरेल, असा ठाम विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. ना. गोरे यांनी आज शुक्रवारी सभास्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यंदाच्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट ठेवून सर्व २६ प्रभागांमध्ये १०२ उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी साडेबारा वाजता हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी […] - [विकास हवा असेल तर पिंपरी-चिंचवड मॉडेल; सोलापुरात राष्ट्रवादीला संधी द्या” – खासदार सुनील तटकरे](https://mh13news.com/give-the-nationalist-congress-party-a-chance-in-solapur/): mh 13 news network पायाभूत सुविधा, उद्योग, नागरी सेवा आणि नियोजनबद्ध विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने झालेला विकास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले. मात्र सोलापूरला अद्याप असा सर्वांगीण विकास का मिळाला नाही, असा सवाल उपस्थित करत आता सोलापूरच्या नव्या विकासाची सुरुवात करण्याची वेळ आली असून पिंपरी-चिंचवडचे विकास मॉडेल सोलापुरात राबविण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. गांधी नगर येथील हेरिटेज येथे शुक्रवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी कृषीमंत्री व पक्षाचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली […] - [“१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका वितरणाचा उपक्रम”](https://mh13news.com/an-initiative-to-distribute-memorial-booklets-to-1-8-million-people/): mh 13 news network साहित्य संमेलनाच्या अटेकेपार डिजीटल स्मरणिकेचे प्रकाशन  सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रत्यक्ष 10 लाखाहून अधिक तर ऑनलाईन साडे सात कोटी नागरिक सहभागी झाले. हे सर्व सातारकर, साहित्य परिषद, मावळा फौंडेशनचे पदाधिकारी व प्रशासनामुळे शक्य झाले. 99 वे साहित्य संमेलन सातारकराच्या कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी संपूर्ण प्रशासनाचे आभार मानत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. अटकेपार साहित्य संमेलनाच्या डिजिटल स्मरणिकेचे प्रकाशन केले. ही स्मरणिका 18 लाख लोकांपर्यंत डिजीटल पद्धतीने पोहचविण्यात आली. 99 व्या साहित्य संमेलनाचे हे एक अगळे […] - [खेळा… जिंका… घडवा भविष्य! राज्य क्रीडा दिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन”](https://mh13news.com/call-for-organizing-initiatives/): mh 13 news network मुंबई, दि. 9 : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणे तसेच नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळा व महाविद्यालयांमध्ये पुढील उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा […] - [मतदानासाठी सरकारचा कडक आदेश! १५ जानेवारीला २९ महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी](https://mh13news.com/strict-government-order-for-voting/): MH 13 NEWS NETWORK मुंबई, दि. 9 : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे . अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये […] - [जबाबदारीचा खेळखंडोबा! सिद्धेश्वर महायात्रा आढावा बैठकीस महापालिकेचा शून्य प्रतिसाद, बैठक रद्द”](https://mh13news.com/the-game-of-responsibility-khandoba/): MH 13 NEWS NETWORK श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची नाराजी सोलापूर श्री सिद्धेश्वर महायात्रा(गड्डा यात्रा) दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत श्री सिद्धेश्वर महायात्रा अनुषंगाने आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता नियोजन भवन सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीस दुपारी 3.30 वाजेपर्यंत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच इन्सिडेंट कमांडर तथा नगर अभियंता श्रीमती सारिका आकुलवार यांची अनुपस्थिती होती. श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 या महत्त्वपूर्ण बैठकीची वेळ होऊन अर्धा तास झाला तरी महापालिकेचे कोणीही जबाबदार अधिकारी आले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा […] - [“जनतेचा कौल ठरणार १५ जानेवारीला! २९ महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान”](https://mh13news.com/the-publics-verdict-will-be-decided-on-january-15/): MH 13 NEWS NETWORK राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी #मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक #सुट्टी जाहीर करण्यात आल्याची #अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. - [प्रभाग ६ मध्ये बहिणींचा जोरदार खेळ! भाजप उमेदवारांसाठी ‘लाडक्या बहिणी’ सक्रिय”](https://mh13news.com/beloved-sister-is-active/): mh 13 news network कोयना नगर, देवतारा नगर व वानकर नगरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर | प्रतिनिधी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना ‘लाडक्या बहिणी’ यांचा भक्कम पाठिंबा मिळत असून, कोयना नगर, देवतारा नगर आणि वानकर नगर येथे आयोजित बैठकींना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडणुकीपूर्वी ३ हजार रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरत असल्याचे मत भाजप उमेदवार मृण्मयी गवळी व सोनाली गायकवाड यांनी व्यक्त केले. गुरुवारी प्रभाग क्रमांक ६ मधील कोयना नगर, देवतारा […] - [“प्रत्येक घर पिंजून काढा, विजय निश्चित! महानगरपालिकेत राष्ट्रवादीचाच झेंडा – दत्तात्रय भरणे”](https://mh13news.com/conquer-every-home-victory-is-certain/): mh 13news network सोलापूर – (प्रतिनिधी)सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी न पडता आपल्या-आपल्या प्रभागात फिरून प्रत्येक घर पिंजून काढावे. जनतेशी थेट संवाद साधत पक्षाने केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवावीत. सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध विकासकामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. आपण स्वतः पालकमंत्री असताना […] - [वरळी–शिवडी–सायन कोळीवाडा मार्गावर शिवसेना महायुतीची ताकद; मुंबईत प्रचाराचा महाधडाका](https://mh13news.com/a-massive-campaign-in-mumbai/): MH 13 news network 🔹 मुंबई | प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना महायुतीची प्रचार रॅली मुंबईत पार पडली. वरळी, शिवडी आणि सायन कोळीवाडा येथे नागरिकांनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी नागरिकांनी आणि लाडक्या बहिणींनी फुले उधळून आणि औक्षण करून उमेदवारांचे स्वागत केले. 🔹 रॅली मार्ग वरळी येथून सुरू झालेली ही प्रचार रॅली पुढील मार्गाने काढण्यात आली:वरळी पोलिस कॅम्प → बिडीडी चाळ → जांबोरी मैदान → वरळी नाका → डॉ. ई. मोजेस रोड → ना.म. जोशी मार्ग → भारत माता सिनेमा मार्ग → शिवडी → शिवडी कोळीवाडा → कॉटन ग्रीन → शिवडी बिडीडी चाळ → काळाचौकी पोलिस चौकी → […] - [प्रभाग २२ मध्ये जनमतावर विकासाचा अजेंडा; संवादातून ठरणार दिशा](https://mh13news.com/in-ward-22-development-agenda-based-on-public-opinion-direction-to-be-decided-through-dialogue/): MH 13 NEWS NETWORK .🔹 सोलापूर | प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान विकासकामांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक, मुद्देसूद आणि विचारपूर्ण चर्चा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या निमित्ताने नागरिक थेट आपल्या अपेक्षा आणि समस्यांवर संवाद साधत असून विकासकेंद्री वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 भाजप उमेदवारांचा थेट जनसंपर्क भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ. अंबिका नागेश गायकवाड व सौ. चैत्राली शिवराज गायकवाड हे पदयात्रा, घरोघरी भेटी आणि गाठीभेटींच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.गुरुवारी धोंडीबा वस्ती, रामवाडी आणि अंबाबाई मंदिर परिसरात त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून […] - [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी रणशिंग फुंकले; तयारी अंतिम टप्प्यात](https://mh13news.com/preparation-is-in-the-final-stage/): MH 13 NEWS NETWORK भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर शनिवारी दुपारी १२.३० वाजता सभा होणार आहे. २०१७ साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न सुरू केले असून सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व २६ प्रभागातून १०२ उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरला सभा होणार असल्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या सभेच्या तयारीसाठी भाजपाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून भाजपाचे […] - [दिल्लीकरांना मराठी सणाची मेजवानी; भरत जाधवांसोबत हुरडा पार्टी व संक्रांत महोत्सव](https://mh13news.com/hurda-party-and-makar-sankranti-festival/): mh 13 news network नवी दिल्ली : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता भरत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत राजधानी दिल्लीत अस्सल मराठमोळ्या चवीचा आणि संस्कृतीचा अनुभव देणारा ‘हुरडा पार्टी’ व ‘मकर संक्रांत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात 9 ते 11 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत हा महोत्सव होणार असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी दिली. मराठी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे ‘पछाडलेला’, ‘जत्रा’, ‘अगं बाई अरेच्चा!’, ‘साडे माडे तीन’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटातील भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते भरत जाधव यांच्याहस्ते  या महोत्सवाचे उदघाटन होणार  आहे. डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र खाद्य महोत्सवाला […] - [राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन](https://mh13news.com/organization-of-constitution-awareness-questionnaire-on-the-occasion-of-national-youth-day/): mh 13 news network १२ जानेवारी च्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने “संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५ -२६” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये संविधानातील मूल्ये, मूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वरूपात १५ दिवसांचे प्रशिक्षण राबविण्यात येणार असून, या प्रशिक्षणात संविधानासंबंधी सखोल माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १० जानेवारी २०२६ पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे. हा राज्यस्तरीय उपक्रम महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व […] - [सोलापुरात निवडणूक सज्जता टॉप गिअरमध्ये; आयोगाकडून ‘फुल-प्रूफ’ तयारीचा आढावा](https://mh13news.com/https-mh13news-com-auto-draft-4/): mh 13 news network सोलापूर /प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया, मतमोजणीची तयारी तसेच का या बैठकीस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी PPT सादरीकरणाद्वारे मतदान व मतमोजणी प्रक्रियेचे सविस्तर नियोजन मांडले. EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) ची सुरक्षित साठवणूक, वितरण व्यवस्था, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतमोजणी केंद्रांचे नियोजन तसेच संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार, पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार यांनी मतदान व मतमोजणी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात आलेल्या […] - [लोकशाहीचा ध्यास: ८९ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे मतदान जनजागृतीत भरीव योगदान](https://mh13news.com/commitment-to-democracy/): mh 13 news network सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी “प्रत्येक मताचे महत्त्व” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेमार्फत सर्जनशील व लोकसहभागात्मक पद्धतीने विविध मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शहरातील सर्व खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित तसेच मनपा शाळा व महाविद्यालयांमध्ये दि. २९ डिसेंबर २०२५ ते दि. ०५ जानेवारी २०२६ या कालावधीत व्यापक स्वरूपात मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. या कालावधीत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा तसेच मतदान जनजागृती रॅली यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी […] - [ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मश्री, पद्मभूषण डॉ. माधवराव गाडगीळ यांचे निधन](https://mh13news.com/dr-madhavrao-gadgil-has-passed-away/): mh 13 news network पुणे/प्रतिनिधी : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित डॉ. माधवराव गाडगीळ यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देशातील पर्यावरण चळवळीला मोठी हानी झाली असून विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. गाडगीळ यांनी भारताच्या विचारप्रवाहात पर्यावरण जनजागृती, संवर्धन आणि त्यासाठी ठोस धोरणांची गरज यावर सातत्याने भर दिला. केवळ लेखन आणि प्रबोधनापुरते न थांबता, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत व अचूक वापर कसा करावा यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले. स्थानिक लोकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षण व्हावे, हा त्यांचा मूलभूत दृष्टिकोन होता. पश्चिम घाटांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. भारतातील जैवविविधता कायद्याचे शिल्पकार म्हणूनही डॉ. गाडगीळ यांचा […] - [आमदार देशमुख–कोठेंच्या उपस्थितीत प्रभाग ७ भाजपमय; भव्य पदयात्रेत हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://mh13news.com/thousands-give-an-enthusiastic-response-to-the-grand-march/): mh 13 news network आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह : औक्षण आणि पुष्पवृष्टीने झाले उमेदवारांचे स्वागत सोलापूर : प्रतिनिधी ढोल ताशांचा गजर, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांची एकत्र प्रमुख उपस्थिती आणि जागोजागी नागरिकांनी औक्षण, पुष्पवृष्टी करत उमेदवारांचे केलेले स्वागत अशा उत्साही वातावरणात प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. चौत्रा पुणे नाका मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने पदयात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी आमदार […] - [पुणेकरांचा कौल स्पष्ट; साथ आणि मत केवळ राष्ट्रवादीला!](https://mh13news.com/the-decision-of-the-people-of-pune-is-clear-support-and-votes-only-for-the-nationalist/): mh 13 news network पुणेकरांचं ठरलंय, साथ अन् मत केवळ राष्ट्रवादीला..! आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून पक्षाला सर्वसामान्य नागरिकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद हा खरोखरच समाधान देणारा आहे. पुणे हे फक्त शहर नाही, तर राज्याच्या प्रगतीत भर घालणाऱ्या महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक मुख्य शहर आहे. पुणे महानगरपालिकेत काम करणारी, सक्षमपणे निर्णय घेणारी आणि जबाबदारी स्वीकारणारी माणसं हवीत. यंदाची ही निवडणूक म्हणजे भाषणांची नाही, तर कामांची परीक्षा आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण हे मुद्दे तुमच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. यावर ठोस काम करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. सामान्य पुणेकराचा आवाज महापालिकेत पोहोचवण्यासाठी, भविष्यातील पुणे अधिक […] - [पुणे-पिंपरीतील नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादीचा ‘एक अलार्म, पाच काम’ कॅम्पेन](https://mh13news.com/ncps-one-alarm-five-actions-campaign-on-urban-issues-in-pune-pimpri/): mh 13 news network पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गंभीर नागरी समस्यांकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. शहरातील मूलभूत सुविधा सातत्यानं अपयशी ठरत आहेत आणि त्याचा थेट फटका नागरिकांना बसतोय. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली. आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नागरी समस्यांचा मोठा अलार्म वाजतोय. वस्त्या-वस्त्यांत साचलेला कचरा, ढासळणाऱ्या आरोग्य सेवा, वाहतूक कोंडी, तुटलेले रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई.. हे सगळे अलार्म नागरिक रोज अनुभवत आहेत. जसं अलार्म आपल्याला वेळेत जागं करतो, तसंच हे प्रश्न प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जागं करण्यासाठी आहेत. कागदावर पुण्याला दरडोई सुमारे ३०० लिटर पाणी दाखवलं जातं, पण […] - [कायापालट करायचा असेल तर धनुष्यबाणालाच मत द्या – शिवसेनेचे आवाहन](https://mh13news.com/if-you-want-change-then-give-your-vote-to-the-bow-and-arrow-shiv-senas-appeal/): mh 13 news network शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज अमरावतीमध्ये जाहीर सभेत #शिवसेना पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकताना केले. मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. महिला भगिनींसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे असेही यावेळी निक्षून सांगितले. अमरावती शहरात पाणीटंचाई, खराब रस्ते, कचरा व्यवस्थापन, लटकलेल्या वीजतारा, स्ट्रीट लाईट, गटार व्यवस्था, उद्याने, मैदाने, स्टेडियम, रुग्णालये असे मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत. नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून कचरा प्रश्नावर मार्ग काढणारच, […] - [संस्कृती जपत युवकांनी विकसित भारतासाठी योगदान द्यावे](https://mh13news.com/youth-should-preserve-culture-and-contribute-to-a-developed-india/): mh 13 news network विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा युवकांशी संवाद मुंबई, दि. ७ : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नव कल्पनांच्य माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५-२६ राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून निवड झालेल्या युवकांशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, सहाय्यक संचालक मिलिंद […] - [रामवाडीतील गैबीपीर नगरात भाजप उमेदवारांची पदयात्रा, प्रभाग २२ मध्ये प्रचाराला वेग](https://mh13news.com/bjp-candidates-foot-march-in-gaibpir-nagar-ramwadi/): mh 13 news network महिलांसह मुस्लिम बांधवांचा सहभाग; सामाजिक एकतेचा संदेश सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ. अंबिका नागेश गायकवाड व सौ. चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे. याच अनुषंगाने बुधवारी रामवाडी परिसरातील गैबीपीर नगर व लगतच्या भागात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत महिलांसह मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली, ज्यामुळे सामाजिक एकतेचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला. माजी नगरसेवक नागेश गायकवाड तसेच लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा […] - [पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन](https://mh13news.com/brainstorming-session-on-animal-husbandry-opportunities-and-programs-in-eastern-vidarbha/): MH 13 NEWS NETWORK शासनातर्फे सन 2026 हे आंतराष्ट्रीय पशूपालक व गवताळ माळरान वर्ष राबविण्यात येत आहे. या औचित्याने महास्ट्राईड प्रकल्पाअंतर्गत पूर्व विदर्भातील पशूपालन संधी आणि कार्यक्रम याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे विचारमंथन करण्यात आले. पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम यावर सादरीकरण करण्यात आले तसेच या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) ने जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्ह्यांच्या सक्षम विकासासाठी संस्थात्मक क्षमता बळकट करण्याकरीता महास्ट्राईड (mahaSTRIDE) हा एक महत्वाकांशी प्रकल्प हाती घेतला आहे,याद्वारे संपूर्ण राज्यात सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना […] - [सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा ](https://mh13news.com/satara-district-has-a-great-tradition-of-fearless-journalism/): MH 13 NEWS NETWORK सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे. चांगल्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना भक्कम पाठींबा देणारी आहे. यापुढेही माध्यम प्रतिनिधींनी लोकहिताची कामे करताना सहकार्य करावे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि माध्यमे यांनी साताऱ्याच्या उज्वल विकासासाठी हातात हात घालून एकत्र काम करुया, असे प्रतिपादन पालकमंत्री देसाई यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्यावतीने पत्रकार, सर्व माध्यमांतील प्रतिनिधींसाठी आयोजित चहापान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह संपादक, वरिष्ठ पत्रकार, इलेक्ट्रानिक मिडीयाचे […] - [राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा  निकाल जाहीर](https://mh13news.com/results-of-the-state-lotterys-biggest-monthly-and-weekly-draws-for-the-month-of-december-announced/): MH 13 NEWS NETWORK महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक व ६ भव्यतम सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष, महाराष्ट्र तेजस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. १७ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव या मासिक सोडतीमधून G-16/9702 या प्रिन्स लॉटरी, कल्याण यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रु.२७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. १९ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष या मासिक सोडतीमधून GS-03/3405 या ओम गं गणपतेय नमः लॉटरी, पुणे यांचेकडून विक्री […] - [दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांनी ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी](https://mh13news.com/organizations-working-in-the-field-of-divyang-should-register-by-january-31st/): MH 13 NEWS NETWORK मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात अनेक संस्था विना नोंदणी कार्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा संस्थांची कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर रविकिरण पाटील यांनी केले आहे. दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ […] - [इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी](https://mh13news.com/scholarship-exam-for-class-4th-and-7th-on-april-26th/): MH 13 NEWS NETWORK राज्यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. शासनमान्य शाळांमधून 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व सातवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी 2 […] - [महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन..](https://mh13news.com/greetings-to-maasaheb-meenatai-thackeray/): MH 13 NEWS NETWORK स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कुंभारी येथील माँसाहेब घरकुल वसाहतीतील बाळासाहेब ठाकरे सभागृहात माँसाहेब मीनाताई ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित बिडी कामगार व कामगार सेना पदाधिकारी बंधू भगिनी यांनी अमर रहे अमर रहे माँसाहेब अमर रहे, माँसाहेब मीनाताई ठाकरे जिंदाबाद, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या त्यानंतर विडी कामगार बंधू-भगिनी व त्यांच्या पाल्यांना लाडू वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज), बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल कुराडकर, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी संतोष जाधव, प्रशांत जक्का, भाग्यलक्ष्मी त्रिमल रेणुका मच्छा, अंबिका […] - [श्री सिद्धरामेश्वर यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी आयुक्तांचा फील्ड दौरा; मार्ग व होम मैदानाची तपासणी](https://mh13news.com/home-ground-inspection/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर : सोलापूर शहरात भाविकांच्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरी होणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज यात्रेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होम मैदानासह नंदी ध्वज मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी केली. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, राजशेखर हिरेहब्बू, नगर अभियंता सारिका आकूलवर, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, मनोज जाधव, सागर करोसेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच नंदी ध्वज मिरवणूक सुरक्षित व सुरळीत पार पडावी, यासाठी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी संबंधित विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मिरवणूक मार्गावरील अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तात्काळ काढून […] - [आमदार कोठेंची खेळी सफल! घोडके गट भाजपच्या मैदानात; विरोधक बॅकफूटवर](https://mh13news.com/mla-kothes-move-is-successful-horse-groups-are-in-bjps-field-opposition-on-the-backfoot/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपासाठी निर्णायक ठरणारा राजकीय घटनाक्रम घडला असून जय मातादी प्रतिष्ठानचे प्रमुख तथा युवकांमध्ये प्रभाव असलेले नेते दिनेश घोडके यांनी भारतीय जनता पार्टीला उघड पाठिंबा जाहीर केल्याने शहरातील चार प्रभागांमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर घोडके यांनी निवडणुकीतून माघार घेत थेट भाजप उमेदवारांच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडीनंतर प्रभाग क्रमांक १३ सोबतच ९, १२ आणि १८ या चारही प्रभागांमध्ये भाजपाच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. जय मातादी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिनेश घोडके यांनी सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून […] - [पावसाळ्यातील पूर टाळण्यासाठी आयुक्तांची मैदानात उतरून पाहणी; हैदराबाद रोडवरील नाल्यांचे काम तपासले](https://mh13news.com/drainage-work-on-hyderabad-road-inspected/): MH 13 NEWS NETWORK हैदराबाद रोड परिसरातील पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची पाहणी; ड्रेनेज पाणी मिसळण्यावर कडक नाराजी सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील हैदराबाद रोड, विडी घरकुल परिसरातील पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये नाला क्र. २० (पोगुल विहार ते हैदराबाद रोड) व नाला क्र. २१ (हैदराबाद रोड ते आदर्श नगर) या सुरू असलेल्या कामाचा समावेश होता. सदर प्रकल्प सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) राबविण्यात येत असून, पर्जन्य जलवाहिनीचे योग्य प्रकारे ट्रेनिंग करणे, काही ठिकाणी नाले बंदिस्त करणे तसेच आवश्यक ठिकाणी पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. पर्जन्य जलवाहिनी ही मुख्यतः पावसाळ्यातील […] - [मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कौतुक](https://mh13news.com/appreciation-from-minister-for-waste-management-jayakumar-gore/): mh 13 news network सोलापूर — जिल्हा परिषद सोलापूर येथे आज राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. अभियानाचे नियोजन, अंमलबजावणी तसेच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. जिल्हा परिषदेत आयोजित आढावा बैठकीत ग्रामविकास विभागाचे कामकाज, करसंकलन, ग्रामपंचायत स्तरावरील उपक्रम व अभियानाची प्रगती याची माहिती सादर करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्यासह अभियान कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सध्या जिल्ह्यात राज्यस्तरावरून विविध सेलिब्रिटी, किर्तनकार […] - [जयराज पार्क–वर्धमान नगर–नाथ रेजन्सी भागात महाविकास आघाडीचा दमदार प्रचार](https://mh13news.com/mahavikas-aghadis-strong-campaign/): mh 13 news network जयराज पार्क–वर्धमान नगर–नाथ रेजन्सी भागात महाविकास आघाडीचा दमदार प्रचार सोलापूर – प्रभाग क्रमांक एकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. रमेश व्हटकर, आरती विटकर, शुभांगी जाबा आणि राकेश सोनी यांनी जयराज पार्क, वर्धमान नगर व नाथ रेजन्सी परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून सघन जनसंपर्क साधला. पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. अनेक ठिकाणी उमेदवारांचे हार व तुरे देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरणात रंगत आली, तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दुमदुमून गेला. हनुमान नगरसह परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधांबाबतच्या समस्या नागरिकांनी स्पष्टपणे मांडल्या. […] - [प्रभाग १८ | ‘लाडक्या बहिणी’च्या भेटीसाठी शिवसेनेची भव्य प्रचार रॅली; राजकीय वातावरण तापले](https://mh13news.com/ward-18-shiv-senas-grand-campaign-rally-for-the-visit-of-beloved-sister-political-atmosphere-heats-up/): सोलापूर – सोलापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांनी विविध प्रभागांत आक्रमक प्रचार करत थेट आव्हान उभे केले असून, त्यात प्रभाग क्रमांक १८ हा हाय-व्होल्टेज प्रभाग म्हणून चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी शिवसेनेच्या उमेदवारांची भव्य प्रचार रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत उमेदवार संतोष संगा यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ही रॅली ‘लाडक्या बहिणी’च्या भेटीच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली असून, मतदारांशी थेट संवादावर भर देण्यात येणार आहे.या प्रचार रॅलीमध्ये निर्मला पासकंटी, महादेवी व्हितनळ्ळी, सुनील निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार […] - [उत्साह आणि विश्वास; प्रभाग २२ मध्ये भाजप पदयात्रेला भरघोस प्रतिसाद](https://mh13news.com/huge-response-to-bjps-march/): MH 13 NEWS NETWORK प्रभाग २२ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद सेटलमेंट परिसरात पदयात्रा व मतदार संवादातून विकासकामांचा आढावा सोलापूर (प्रतिनिधी):सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ. अंबिका नागेश गायकवाड आणि सौ. चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे. याच अनुषंगाने मंगळवारी सेटलमेंट परिसरात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ व मार्गदर्शक लक्ष्मण जाधव तसेच प्रभाग क्रमांक २२ चे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा पार पडली. पदयात्रेदरम्यान लिमयेवाडी, कावळा […] - [काम बोलत आहे! प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजप उमेदवार गणेश वानकरांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद](https://mh13news.com/bjp-candidates-showered-with-praise/): \ MH 13 NEWS NETWORK प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजप उमेदवार गणेश वानकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद होम टू होम प्रचारात नागरिकांचा विश्वास, महिलांकडून आरती करून स्वागत सोलापूर (प्रतिनिधी):राजकारणात नेता कोणत्या पक्षात आहे, यापेक्षा त्याने जनतेसाठी केलेली कामे महत्त्वाची ठरतात, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे उमेदवार गणेश वानकर यांना प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपचे उमेदवार गणेश वानकर, सोनाली गायकवाड, मृण्मयी गवळी आणि सुनील खटके यांच्या होम टू होम प्रचाराचा मंगळवारी दुसरा दिवस होता. सकाळच्या सत्रात साठे पाटील वस्ती व थोबडे वस्ती परिसरात प्रचार करताना नागरिकांशी थेट […] - [“पथनाट्यातून स्त्री अत्याचार,जात-धर्मवाद, शेतकरी प्रश्न व मतदानाबाबत प्रबोधन”](https://mh13news.com/education-on-womens-atrocities-caste-religiousism-farmer-issues-and-voting-through-street-plays/): MH 13 NEWS NETWORK उत्कर्ष महोत्सवात १६ विद्यापीठाकडून पथनाट्याचे सादरीकरण! सोलापूर, दि.६- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सव अंतर्गत मंगळवारी झालेल्या पथनाट्य स्पर्धेत सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर प्रभावी भाष्य करण्यात आले. महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, स्वच्छता, राजकारण, जात-धर्मवाद, आरोग्य, भाषावाद, मतदान, मराठी शाळांचे प्रश्न अशा विविध ज्वलंत मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या पथनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यापीठाच्या बास्केटबॉल मैदान परिसरात ही स्पर्धा पार पडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघाने ‘शूरवीरांचे एकच गाव – भीमा कोरेगाव’ हे पथनाट्य सादर करून विशेष दाद मिळवली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने ‘स्कोअर काय झाला?’ या पथनाट्यातून भाषावाद, राजकारण आणि महिला […] - [“संकल्पना नृत्य, पोवाडा व लोककलांतून समाजप्रबोधनाचा संदेश”](https://mh13news.com/message-of-social-awareness-through-conceptual-dance-powada-and-folk-art/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर विद्यापीठात ‘उत्कर्ष’ महोत्सवाचा भव्य सांस्कृतिक सोहळा महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या राज्यस्तरीय ‘उत्कर्ष’ सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी लोककलेच्या सादरीकरणातून समाजप्रबोधनाचा जागर करण्यात आला. पोवाडा, भारुड, अभंग, संकल्पना नृत्य आणि लोकवाद्यांच्या तालावर विद्यापीठ परिसर अक्षरशः सांस्कृतिक उत्साहाने भारावून गेला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा पोवाड्यांच्या माध्यमातून सादर करत विद्यार्थ्यांनी इतिहास जिवंत केला. शाहिरांच्या खणखणीत आवाजात आणि डफाच्या जोशपूर्ण तालावर अफझलखानाचा वध, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि शिवरायांचे लोककल्याणकारी राज्य यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज […] - [सोलापूर शहरासाठी नियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर](https://mh13news.com/the-issue-of-regular-water-supply-for-solapur-city-is-on-the-agenda-again/): सोलापूर शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – आमदार देवेंद्र कोठे mh 13 news network आमदार देवेंद्र कोठे यांचे अभिवचन; प्रभाग क्र. 13 भाजपच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन सोलापूर : सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे एक प्रकारचा शाप आहे. ही स्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 892 कोटींची योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्ण करून शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे अभिवचन शहर मध्यचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी सोमवारी दिले.सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजप उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, यंत्रमाग उद्योजक भूपती कमटम, […] - [प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवारांची पदयात्रा; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://mh13news.com/spontaneous-response-from-voters/): mh 13 news network सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असताना प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवारांनी होम-टू-होम प्रचार आणि पदयात्रेद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या प्रचाराला मतदारांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. न्यू बुधवार पेठ परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार कविताताई चंदनशिवे, सुशील बंदपट्टे, सारिकाताई फुटाणे आणि विश्वनाथ बिडवे यांनी घराघरांत जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज तसेच इतर मूलभूत नागरी समस्यांबाबत आपल्या अडचणी उमेदवारांसमोर मांडल्या. श्रीराम नगर परिसरात झालेल्या होम-टू-होम प्रचारादरम्यान महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक महिला भगिनींनी उमेदवारांचे स्वागत करत […] - [प्रभाग ६ मध्ये भाजपाचा झंझावात! होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://mh13news.com/citizens-spontaneous-response-to-home-to-home-campaign/): mh 13 news network सोलापूर – (प्रतिनिधी) सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजप उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाचे उमेदवार सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या होम टू होम प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसोबत चारही उमेदवार गेल्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. गडदर्शन सोसायटी, गवळी वस्ती, प्रियदर्शनी अपार्टमेंट तसेच बांधवस्ती परिसरात झालेल्या प्रचारात नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासह विविध मूलभूत समस्यांचा पाढा उमेदवारांसमोर मांडला. महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येणार असल्याने प्रभाग क्रमांक ६ मधील पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांचे प्रश्न कायमस्वरूपी […] - [महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक खर्च समितीची स्थापना; उमेदवारांसाठी प्रशिक्षण बैठक](https://mh13news.com/training-meeting-for-candidates/): mh 13 news network सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च समितीची स्थापना करण्यात आली असून, याअनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच उमेदवारांचे अधिकृत खर्च प्रतिनिधी यांच्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी निवडणूक खर्चासंदर्भातील नियम व मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी प्रचारासाठी करण्यात येणारा प्रत्येक खर्च नियमबद्ध, पारदर्शक व वेळेत नोंदवणे बंधनकारक असल्याचे डॉ. जवळगेकर यांनी स्पष्ट केले. उमेदवारांनी […] - [भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक आणि इशारा](https://mh13news.com/appreciation-and-warning-from-bjp-state-president/): mh 13 news network भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी न मिळूनही प्रचारात झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. परंतु पक्ष विरोधात काम करणाऱ्यांवर भाजपाकडून कारवाई करणार असल्याचा इशाराही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिला. Ravindra Chavan Kothe Devendra Rajesh Jaykumar Gore Vijay Deshmukh Subhash Deshmukh Devendra Fadnavis Sachin Kalyanshett - [दररोज पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटींची योजना पूर्ण करण्याला अन आयटी पार्कला भाजपाच्या जाहीरनाम्यात प्राधान्य](https://mh13news.com/rs-892-crore-scheme-for-daily-water-supply/): mh 13 news nhetwork भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटींची योजना पूर्ण करण्याला अन आयटी पार्क सुरू करण्याला भाजपाच्या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी जामगोंडी मंगल कार्यालयात झाले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस प्रा. नारायण […] - [काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन; देशाने गमावला अनुभवी लोकनेता](https://mh13news.com/the-country-has-lost-an-experienced-leader/): mh 13 news network नवी दिल्ली / पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेले सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी व संघर्षातून घडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या जाण्याने राजकारणासह सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात प्रवेश करत राष्ट्रीय पातळीवर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. तसेच ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (IOA) चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय […] - [सोलापूर महानगरपालिका निवडणूक – २०२६ : महाविकास आघाडीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ](https://mh13news.com/grand-launch-of-mahavikas-aghadis-campaign/): mh 13 news network दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रणशिंग फुंकले; सोलापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार सोलापूर lदिनांक, ०५ जानेवारी २०२६ सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अधिकृत प्रचाराचा भव्य शुभारंभ करून रणशिंग फुंकले आहे. आघाडी स्थापन करणे, उमेदवारी जाहीर करणे यासह सर्वच पातळ्यांवर महाविकास आघाडीने निर्णायक आघाडी घेतली असून, सोमवार दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता हेरिटेज सी लॉन, गांधी नगर, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. महाविकास आघाडीचे नेते खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, कॉ. नरसय्या […] - [प्रभाग सहा भाजपाचा बालेकिल्ला होणार..! होम to होम मधून उमेदवारांना पाठिंबा](https://mh13news.com/ward-6-will-be-bjps-stronghold-support-for-candidates-from-home-to-home/): सोलापूर – (प्रतिनिधी)सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजप उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाचे उमेदवार सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या होम टू होम प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसोबत चारही उमेदवार गेल्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. गडदर्शन सोसायटी, गवळी वस्ती, प्रियदर्शनी अपार्टमेंट तसेच बांधवस्ती परिसरात झालेल्या प्रचारात नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासह विविध मूलभूत समस्यांचा पाढा उमेदवारांसमोर मांडला. महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येणार असल्याने प्रभाग क्रमांक ६ मधील पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील, तसेच हा प्रभाग […] - [“तुमचे मत, आमचे व्हिजन!” प्रभाग ७ मध्ये भाजप उमेदवारांचा होम-टू-होम धडाका; परिवर्तनाचा ठाम दावा..](https://mh13news.com/your-vote-our-vision-bjp-candidates-door-to-door-campaign-in-ward-7-strong-claim-of-change/): MH13NEWS Network सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर शहरातील हाय व्होल्टेज आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचाराची रणनीती अवलंबली असून “तुमचे मत, आमचे व्हिजन – प्रभाग सातचे परिवर्तन” या संकल्पनेसह चारही अधिकृत उमेदवारांनी होम-टू-होम प्रचार करत संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग सातमध्ये भाजपने विकास, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत नागरी सुविधांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या प्रचाराला वेग आला असून स्थानिक नागरिकांमध्येही परिवर्तनाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपचे अधिकृत उमेदवार नाना काळे, आनंद कोलारकर, उत्तरा बरडे–बचूटे आणि श्रद्धा पवार यांनी घराघरांत जाऊन […] - [कमळ’ विजयासाठी रणशिंग फुंकले; भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन](https://mh13news.com/bjps-central-election-office-inaugurated/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर /प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने सज्ज असल्याचे प्रतिपादन भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले. डफरीन चौकातील सारस्वत मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या भाजपच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी नगरसेविका प्रा. मोहिनी पत्की, सरचिटणीस सुधा अळीमोरे, अंबादास बिंगी, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे, उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, साधना संगवे, नागेश सरगम यांची उपस्थिती होती. शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, निवडणूक प्रचाराचे नियोजन, मेळावे, सभा, मतदार यादीविषयी मार्गदर्शन तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणा या मध्यवर्ती कार्यालयातून राबवली जाणार आहे. […] - [हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न](https://mh13news.com/hind-di-chadar/): MH 13 NE3WS NETWORK हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार नांदेड :“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा विधी आज नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमीपूजन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव संप्रदाय व उदासीन संप्रदाय या समाजातील संतांची उपस्थिती लाभली.हिंद-दी-चादर कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर […] - [संपर्क, संघटन आणि सोशल मीडियावर भर द्या; भाजप उमेदवारांच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन](https://mh13news.com/guardian-ministers-guidance-at-bjp-candidates-meeting/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर – (प्रतिनिधी) सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारापर्यंत थेट संपर्क साधून भाजपाची ध्येयधोरणे, विकासकामे व शासनाच्या योजना पोहोचवाव्यात, असे स्पष्ट आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे भाजप उमेदवारांची बैठक पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीस आमदार देवेंद्र कोठे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भाजप पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत असून उमेदवारांनी प्रभागनिहाय व्यापक जनसंपर्क साधावा. केंद्र व राज्यात भाजप सरकारने केलेली विकासकामे, […] - [ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर](https://mh13news.com/suggestions-for-improvements-to-the-app-must-be-submitted-by-january-10th/): MH 13 NEWS NETWORK भारत निवडणूक आयोगाचे आवाहन नवी दिल्ली भारत निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना १० जानेवारी पर्यंत देण्याचे आवाहन केले आहे. वापरकर्ता नागरिक ॲपमधील ‘Submit a Suggestion’ या पर्यायाद्वारे आपल्या सूचना नोंदवू शकतात. ECINet ॲपच्या  प्रायोगिक आवृत्तीच्या माध्यमातून मतदारांना उत्तम सेवा पुरवण्याबरोबरच मतदानाच्या टक्केवारीचे कल त्वरित उपलब्ध करून देणे आणि मतदानानंतर फक्त ७२ तासांच्या आत इंडेक्स कार्ड प्रसिद्ध करणे अशा सुविधा पूरविणे शक्य होणार आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने लागत होते. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ तसेच विविध पोटनिवडणुकांवेळी या ॲपची […] - [आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान अजरामर; सोहन लोंढे यांच्या आठवणींना उजाळा](https://mh13news.com/remembering-sohan-londhe/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर – (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष व आंबेडकरवादी युवा नेते दिवंगत सोहन लोंढे यांच्या निवासस्थानी बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मंगळवारी सांत्वनपर भेट दिली. या भेटीदरम्यान सुजात आंबेडकर यांनी सोहन लोंढे यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. सुजात आंबेडकर यांनी सोहन लोंढे यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा विशेष उल्लेख करत, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या प्रभावी कामगिरीची आठवण करून दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत स्वतः सोहन लोंढे यांनी उमेदवार उभा केल्याची बाब नमूद करत, ते कार्यकर्त्यांशी किती घट्ट नातं जपणारे होते, हे अधोरेखित केले. आपल्या संपर्कातील प्रत्येक कार्यकर्त्याबाबत सजग आणि […] - [मनसे विद्यार्थी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणातील आणखी 11 आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी](https://mh13news.com/accused-remanded-in-police-custody-for-4-days/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर- जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे याची तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी फरार आरोपी 1)विशाल शंकर शिंदे 2)सुनील शंकर शिंदे 3)राहुल राजू सरवदे 4)ईश्वर सिद्धेश्वर शिंदे 5)रोहित राजू सरवदे6)महेश शिवाजी भोसले 7)शंकर बाबू शिंदे 8)अनिल शंकर शिंदे 9)शारदा तानाजी शिंदे 10)आलोक तानाजी शिंदे 11)विशाल ऊर्फ दादू संजय दोरकर यांना जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत हकिकत अशी की, मयताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे (वय २५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून […] - [अक्कलकोट : प्रियकराकडून २२ वर्षीय तरुणीची हत्या; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न — प्रकृती नाजूक](https://mh13news.com/22-year-old-girl-murdered-by-boyfriend-boyfriend-attempts-suicide/): mh 13 news network अक्कलकोट | प्रतिनिधी : अक्कलकोट शहरात घडलेल्या धक्कादायक घटनेत २२ वर्षीय स्नेहा श्रीकांत बनसोडे हिची तिच्या प्रियकराने गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना रविवार, ४ जानेवारी रोजी दुपारी सुमारास लोखंडे मंगल कार्यालयाजवळील कोळी यांच्या बंगल्यातील लॉजमध्ये घडली. आरोपी आदित्य रमेश चव्हाण (वय २४, रा. नागूर तांडा, ता. अक्कलकोट) याने स्नेहाची हत्या केल्यानंतर स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी असून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत तरुणी : स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय २२ वर्षे) रा. रामवाडी, सोलापूर सध्या शिक्षणासाठी मैंदर्गी येथे वास्तव्यास या प्रकरणी […] - [प्रभाग ६ मध्ये ‘विकासगंगा’ आणण्याचा शब्द; देगावमध्ये भाजप प्रचाराचा नारळ, विजयी सभेचा जल्लोष!](https://mh13news.com/the-noise-of-bjp-campaigning-in-the-village-the-joy-of-the-victory-rally/): mh 13 news network सोलापूर – (प्रतिनिधी) केंद्र व राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरीव विकास झाला असून, सोलापूर महानगरपालिकेतही भाजपची सत्ता येणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजारोंच्या साक्षीने दिला. सोलापूर महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यानंतर झालेल्या विराट सभेला लाडक्या बहिणींसह नागरिकांची रेकॉर्डब्रेक उपस्थिती लाभली. सभामंडप गर्दीने ओसंडून वाहत होता. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गती वाढली असून लाडक्या बहिणी समाधानी आहेत. […] - [प्रभाग ६ | आज रविवारी भाजप प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; 'देगाव'मध्ये पालकमंत्री यांचा जनसंवाद..](https://mh13news.com/ward-6-bjp-campaign-kicks-off-with-a-bang-this-sunday-guardian-ministers-public-interaction-in-degaon/): सोलापूर | प्रतिनिधीसोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीने प्रचाराची आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा सोलापुरातील पहिला अधिकृत शुभारंभ रविवारी सकाळी ९ वाजता देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात होणार आहे.या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात येणार असून, त्यानंतर ते थेट प्रभागातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे यांनी दिली. या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने तसेच भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांची उपस्थिती राहणार आहे .प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपकडून सोनाली […] - [स्वतःच्याच आईला शिवीगाळ करणाऱ्या मित्राच्या खून आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता..](https://mh13news.com/two-acquitted-of-murder-charges-against-friend-who-abused-his-own-mother/): सोलापूर- तोडकर वस्ती बाळे येथील लखन रघुनाथ गायकवाड हा दारू पिऊन स्वतःच्याच आईला शिवीगाळ करीत असल्याने व समजावून सांगूनही ऐकत नसल्याने त्याचा लाकडी दांडकंयाने व प्लास्टिक पाईपने मारहाण करून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपी नागेश कोळेकर व आशुतोष ऊर्फ आवि गाडेकर दोघे रा. तोडकर वस्ती, बाळे, सोलापूर यांची मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (श्री. कटारिया सो) यांनी निर्दोष मुक्तता केली. यात हकिकत अशी की, दि.16/5/2024 रोजी दुपारी 4.30 वा चे सुमारास नागेश कोळेकर व आशुतोष गाडेकर हे फिर्यादी अल्का रघुनाथ गायकवाड यांचा मुलगा लखन यास घरी घेवून आले होते. त्यावेळी फिर्यादीचे गल्लीतील अजय मोहन भोसले हा घरी आला होता त्यावेळी लखन […] - [सोलापूरात बिनविरोधसाठी भाजपाचे दबावतंत्र; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप](https://mh13news.com/praniti-shindes-serious-allegations/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर (दि. ३) : सोलापुरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येने शहरातील राजकारणाला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक २ च्या उमेदवारासह तब्बल १५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सोलापुरात थेट खून होतो, ही अतिशय गंभीर बाब आहे. भाजपकडे उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध निवडणुकांसाठी दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे, ही लाजिरवाणी परिस्थिती आहे,” असा आरोप त्यांनी केला. […] - [पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे](https://mh13news.com/dr-suryaprakash-kote-as-the-president-of-west-maharashtra-padmashaali-sangh/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर गत एक वर्षापासून रिक्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्षपद अखेर भरण्यात आले आहे. यापदी कोठे परिवाराचेच डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हैदराबाद येथील पद्मशाली भवनात शनिवारी अखिल भारतीय पद्मशाली संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांना पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेले पत्र देण्यात आले.यावेळी अखिल भारत पद्मशाली संघाच गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, अध्यक्ष कंदकटला स्वामी, जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम, उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल ,राजकीय विभागाचे अध्यक्ष बोलला शिवशंकर, सेक्रेटरी तुकेश भैरी, महाराष्ट्रचे निरीक्षक संगा, मुंबई पद्मशाली संघाचे अध्यक्ष जगनबाबू गंजी, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली […] - [खो-खोचा महासंग्राम! महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची उपांत्य पूर्व फेरीत धडक!!](https://mh13news.com/the-great-war-of-kho-kho/): गळुरूच्या मातीत घुमली महाराष्ट्राची सिंहगर्जना राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा बेंगळुरू गंजूरच्या मैदानावर मराठी खेळाडूंनी जणू वीज कोसळवली! भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने कर्नाटक खो-खो असोसिएशनतर्फे आयोजित ४४ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी आक्रमक, चपळ आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत दणदणीत प्रवेश केला. चित्त्याच्या चपळाईसह खेळलेले हे सामने पाहून संपूर्ण देशाचे लक्ष आता मराठी वाघांकडे खिळले आहे. महाराष्ट्राची विजयाची वारी; ओडिशावर दहा गुणांची मात कुमार गटात महाराष्ट्राने ओडिशावर ३४–२४ असा दहा गुणांनी विजय मिळवला. मध्यांतराला २४–१० अशी भक्कम आघाडी घेत महाराष्ट्राने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने वळवला. महाराष्ट्राच्या जितेंद्र वसावे (२.२० व नाबाद १.१० मि. […] - [राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीतमतदान यंत्रांची तपासणी सुरू](https://mh13news.com/inspection-of-voting-machines-begins-in-the-presence-of-political-party-representatives/): MH 13 NEWS NETWORK महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकसोलापूर : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) प्रथम स्तरीय तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेची महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी केली.सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी प्रक्रिया शुक्रवारी हुतात्मा स्मृती मंदिराच्या मागील बाजूस सुरू झाली. 2 जानेवारीपासून सुरू झालेली ही प्रक्रिया 4 जानेवारीपर्यंत चालणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह व त्रुटीरहित राहावी, या उद्देशाने मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपासणीची प्रक्रिया भारत […] - [सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मातृशोक..!](https://mh13news.com/condolences-to-solapur-city-north-mla-vijay-kumar-deshmukh/): MH 13 NEWS NETWORK जच सायंकाळी अंत्यसंस्कार.. सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख, वय वर्ष 90 वृद्धापकाळाने निधन झाले असून आज सायंकाळी चार वाजता काळजापूर मारुती नजीक असलेल्या आमदार देशमुख यांच्या घराजवळून अंत्ययात्रा निघणार आहे.देगांव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. देगाव येथील त्यांच्या देशमुख मळा या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुले,मुली, नातवंडे असा मोठा परिवार होता. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. - [सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६](https://mh13news.com/solapur-municipal-corporation-general-election-2026/): MH 13 NEWS NETWORK ईव्हीएम व मतदान साहित्य वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी ठिकाणे अधिकृत… सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १५/०१/२०२६ रोजी मतदान व दि. १६/०१/२०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले ईव्हीएम मशीन, मतदान साहित्य वितरण व स्वीकृती, मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवणे तसेच मतमोजणीची ठिकाणे निश्चित करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या इमारतींमधील खोल्या व खुल्या जागा अधिकृत केल्या आहेत. सदर ठिकाणांचा वापर मतदान साहित्य वितरण व स्वीकृती, ईव्हीएम मशीनसाठी स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणीसाठी करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व […] - [आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन; अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांचे निर्देश](https://mh13news.com/appeal-to-follow-model-code-of-conduct-additional-commissioner-veena-pawars-instructions/): MH 13 NEWS NETWORK निवडणूक आयोगासाठी निवडणूकांच्या काळात माध्यमे आयोगाचे कान आणि डोळे आहेत. माध्यमात पैसे किंवा वस्तूच्या मोबदल्यात (प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक्स) कोणतेही प्रसारीत किंवा प्रकाशित वृत्त यावर माध्यम संनियत्रंण चे विशेष लक्ष व नियत्रंण राहणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधी उमेदवार यांच्याकरिता आयोजित बैठकीदरम्यान माहिती दिली. 15 डिसेंबर 2025 पासून शहरांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याकरिता एकूण 3115 बॅनर फलक,101 झेंडे हे काढून टाकले आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन हे प्रत्येकाने करायचे असून, कोणताही पक्ष अथवा उमेदवार यांनी धार्मिक तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू […] - [राज–उद्धव ठाकरे एकत्र : सोलापुरात जल्लोष, मराठी ऐक्याचा जयघोष](https://mh13news.com/joy-in-solapur-shouts-of-marathi-unity/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर — मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येत असल्याची घोषणा होताच सोलापुरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक घडामोडीचे स्वागत करत शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. सोन्या मारुती गणपती मंदिरात महाआरती करून मनसे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दोन बंधू एकत्र येणे म्हणजे मराठी माणसाच्या ऐक्याची ताकद असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि जल्लोषात “मराठी एकजूट जिंदाबाद”चे नारे दिले गेले. या राजकीय एकत्रिकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, मनसे जिल्हाप्रमुख […] - [राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडले घडयाळ...! हाती घेतले कमळ](https://mh13news.com/lotus-taken-up/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठी राजकीय घडामोड, राष्ट्रवादीचे नेते किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा भाजप प्रवेश सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक नागेश गायकवाड ,राष्ट्रवादी गटनेते किसन जाधव व ईच्छा भगवंताची ग्रुप मधील पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी माजी स्थायी समिती सभापती श्री विनायक कोंड्याल,माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर,माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आदी उपस्थित होते. - [विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी प्राचार्य गजानन धरणे यांची निवड](https://mh13news.com/principal-gajanan-dharane-elected-as-president/): MH 13 NEWS NETWORK विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्षपदी सोलापूरचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व संघटनात्मक अनुभव असलेले प्राचार्य श्री. गजानन धरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ प्रांतातील हस्तिनापूर येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रन्यासी मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. मूळचे सोलापूरचे असलेले प्राचार्य गजानन धरणे हे विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) मध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून आजही ते अभाविपशी सक्रियपणे जोडलेले आहेत. सध्या ते सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूरच्या शैक्षणिक व सामाजिक […] - [सोलापूर महापालिका निवडणूक ताकदीने लढा; संपूर्ण पाठबळ देऊ : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे](https://mh13news.com/fight-the-solapur-municipal-election-with-strength/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा, राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी करतो, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. तीन दिवसात तब्बल ४१२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्यामुळे उत्साह दुणावला आहे.आणखी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यात येत आहेत. अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केल्यामुळे हा आकडा ५०० पार जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी मुंबईमध्ये कुलाबा येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष […] - [गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार](https://mh13news.com/gaudgaon-b-will-become-a-new-center-of-religious-and-rural-tourism/): MH 13 NEWS NETWORK सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव (ता. अक्कलकोट) हे गाव धार्मिक आणि ग्रामीण परंपरेचा अनोखा संगम असलेले गाव म्हणून पुढे येत आहे. जिल्हाधिकारी श्री. कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या पर्यटन विकास उपक्रमात गौडगावचा समावेश “धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे गाव” म्हणून करण्यात आला आहे. गौडगाव हे जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिरासाठी राज्यभर प्रसिद्ध असून, समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. उपलब्ध झालेल्या माहिती नुसार चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, रामनवमी तसेच श्रावण अमावास्येला महाराष्ट्रातूनच नाही तर तेलंगना आणि कर्नाटक या राज्यातून देखील येथे हजारो […] ## Pages - [ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!](https://mh13news.com/):   TRENDING अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष 29 November 2025 अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप.. 29 November 2025 शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण 27 November 2025 मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट… 25 November 2025 बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा 24 November 2025 Next Prev Optimal Column This module works best for column 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ( current column width 4 ). This […] - [Home](https://mh13news.com/home/): [vc_row][vc_column][jnews_element_newsticker compatible_column_notice=”” newsticker_title=”ताज्या घडामोडी” newsticker_icon=”fas fa-video” autoplay_delay=”3000″ number_post=”5″ post_offset=”0″ enable_autoplay=”true”][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”2/3″][jnews_hero_6 compatible_column_notice=”” hero_margin=”0″ content_filter_number_alert=”” post_offset=”0″][/vc_column][vc_column width=”1/3″][vc_raw_html]JTNDaWZyYW1lJTIwc3JjJTNEJTIyaHR0cHMlM0ElMkYlMkZ3d3cuZmFjZWJvb2suY29tJTJGcGx1Z2lucyUyRnBhZ2UucGhwJTNGaHJlZiUzRGh0dHBzJTI1M0ElMjUyRiUyNTJGd3d3LmZhY2Vib29rLmNvbSUyNTJGTUgxM05FV1MlMjUyRiUyNnRhYnMlM0R0aW1lbGluZSUyNndpZHRoJTNEMzQwJTI2aGVpZ2h0JTNENTAwJTI2c21hbGxfaGVhZGVyJTNEZmFsc2UlMjZhZGFwdF9jb250YWluZXJfd2lkdGglM0R0cnVlJTI2aGlkZV9jb3ZlciUzRGZhbHNlJTI2c2hvd19mYWNlcGlsZSUzRHRydWUlMjZhcHBJZCUzRDE1MTg2NDM1MDUxODIwOTglMjIlMjB3aWR0aCUzRCUyMjM0MCUyMiUyMGhlaWdodCUzRCUyMjUwMCUyMiUyMHN0eWxlJTNEJTIyYm9yZGVyJTNBbm9uZSUzQm92ZXJmbG93JTNBaGlkZGVuJTIyJTIwc2Nyb2xsaW5nJTNEJTIybm8lMjIlMjBmcmFtZWJvcmRlciUzRCUyMjAlMjIlMjBhbGxvd2Z1bGxzY3JlZW4lM0QlMjJ0cnVlJTIyJTIwYWxsb3clM0QlMjJhdXRvcGxheSUzQiUyMGNsaXBib2FyZC13cml0ZSUzQiUyMGVuY3J5cHRlZC1tZWRpYSUzQiUyMHBpY3R1cmUtaW4tcGljdHVyZSUzQiUyMHdlYi1zaGFyZSUyMiUzRSUzQyUyRmlmcmFtZSUzRQ==[/vc_raw_html][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][jnews_block_21 compatible_column_notice=”” sponsor=”” number_post=”21″ post_offset=”5″ included_only=”” pagination_mode=”scrollload” pagination_number_post=”9″ pagination_scroll_limit=”0″][jnews_element_header compatible_column_notice=”” header_icon=”fab fa-youtube” first_title=”YouTube Channel”][vc_raw_html]JTVCZW1iZWR5dCU1RCUyMGh0dHBzJTNBJTJGJTJGd3d3LnlvdXR1YmUuY29tJTJGZW1iZWQlM0ZsaXN0VHlwZSUzRHBsYXlsaXN0JTI2bGlzdCUzRFVVYUdpTHZFY1Mwelg2UGZGQ3FPWjI3dyUyNmxheW91dCUzRGdhbGxlcnklNUIlMkZlbWJlZHl0JTVE[/vc_raw_html][jnews_block_21 compatible_column_notice=”” header_icon=”fas fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”6″ post_offset=”0″ included_only=”” include_category=”5″ first_title=”राजकीय”][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][jnews_element_header compatible_column_notice=”” header_icon=”fas fa-newspaper” header_type=”heading_2″ first_title=”सोलापूर शहर”][jnews_hero_7 compatible_column_notice=”” hero_margin=”0″ sponsor=”” content_filter_number_alert=”” post_offset=”0″ included_only=”” include_category=”8″][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][jnews_block_21 compatible_column_notice=”” header_icon=”fas fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”6″ post_offset=”0″ included_only=”” include_category=”6″ first_title=”सामाजिक”][jnews_block_21 compatible_column_notice=”” header_icon=”fas fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”6″ post_offset=”0″ included_only=”” include_category=”7″ first_title=”शैक्षणिक”][jnews_block_21 compatible_column_notice=”” header_icon=”fas fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”6″ post_offset=”0″ included_only=”” include_category=”15″ first_title=”व्यापार”][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)