mh 13 news network
दिल्ली |
देशाच्या राजधानीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण भारताला हादरवून सोडलं आहे. या स्फोटात १३ हून अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. राजधानीसारख्या उच्च सुरक्षा क्षेत्रात असा स्फोट होणे ही अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक बाब मानली जात आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल ३०० किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीतील स्फोट आणि जम्मूमधील कारवाई — या दोन्ही घटना देशाच्या आंतरिक सुरक्षेला गंभीर इशारा देणाऱ्या ठरत आहेत.
स्फोटानंतर दिल्ली पोलिस, एनआयए, आणि गुप्तचर विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमागील मास्टरमाईंड आणि आरोपींचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे.








