MH 13 NEWS NETWORK
सोलापूर, दि.11 — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सोलापूर लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे साहेब यांनी आज काँग्रेस भवन, सोलापूर येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.

या प्रसंगी माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, तसेच पृथ्वीराज नरोटे, सुशीलकुमार म्हेत्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ही सदिच्छा भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून, शहरातील राजकीय घडामोडींना नविन दिशा देणारी ठरू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.