सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या गणपती पूजेस खासदार प्रणिती शिंदे उपस्थित राहिल्या. त्यांनी श्रींचे मनोभावे पूजन करून सोलापूरच्या पूर्व भागाचा तसेच शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यंत्रमाग, विडी उद्योग व कष्टकरी वर्गाच्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना गणरायांच्या चरणी केली.
सोलापूरचा पूर्व भाग परंपरा, व्यापारी व्यवहार आणि श्रमिक वर्गाच्या गजबजाटासाठी ओळखला जातो. हातमाग, यंत्रमाग, विडी उद्योग, सहकार चळवळ आणि कामगार संघटनांमुळे या भागाने राज्यभरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पद्मशाली समाजाने आपल्या कष्टाच्या जोरावर चादर-टॉवेल उद्योगाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली, हे विशेष उल्लेखनीय आहे.

या कार्यक्रमात मंडळाचे विश्वस्त जनार्दन कारमपुरी, पांडुरंग दिड्डी काका, मध्यवर्ती अध्यक्ष लोकेश नंदाल यांच्या हस्ते खासदार प्रणिती शिंदे यांचा स्वागत-सन्मान करण्यात आला.

यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष लोकेश नंदाल, मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला, विनोद केंजरला, विजय निली, प्रशांत कुडक्याल, मनोज पिस्के, राजदत्त गुंजाळ, श्रीनिवास आडम, शुभम एकलदेवी, श्रीनिवास म्याकल, अविनाश मंगलपल्ली, गिरीश गोसकी, प्रवीण जिल्ला, नरेंद्र बोंम्मेन, जिल्ला पंतलू, अरविंद रंगा यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
