MH 13 News Network
काँग्रेसचे युवा नेते सुदीप चाकोते यांनी आज भर दुपारी पदयात्रेने काँग्रेस भवनात इच्छुक उमेदवारी अर्ज भरला. भर उन्हात सुद्धा हजारोंची उपस्थिती असल्याने शहर उत्तर मधील सर्व पक्षांमध्ये चर्चा होत आहे. सुदीप चाकोते हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
शहर उत्तर आणि दक्षिण विधानसभेमधून आमदारकीसाठी इच्छुक असणारे सुदीप चाकोते यांनी आज शनिवारी दुपारी हजारोंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी विविध जाती धर्मातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. चाकोते यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व समाज घटकांच्या मोर्चे बांधणीची झलक पदयात्रेत दिसून आली. जागोजागी त्यांचा हारतुर्यांनी सत्कार होत होता.
हलगीचां कडकडाट करीत चाकोते यांच्या संपर्क कार्यालयापासून काँग्रेस भवनापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. यामध्ये हजारो तरुणांचा सहभाग होता. जवळपास तीनशे दुचाकी धारक आणि चार चाकी वाहनातून कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.
इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता लास्ट इज बेस्ट असे म्हणत काँग्रेस शहराध्यक्षांनी चाकोते यांना शुभेच्छा देत उमेदवारी अर्ज स्वीकारला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
राहुल गांधीच्या यंग ब्रिगेडचे चाकोते हे प्रदेशाध्यक्ष असून राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, नूतन खासदार प्रणिती शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची जवळीक आहे. याचा उपयोग त्यांना उत्तर मधील उमेदवारी निश्चित करण्यामध्ये होऊ शकतो. लिंगायत समाजामधील शहर उत्तर मधील काँग्रेस मधील सक्षम नेतृत्व म्हणून त्यांचे पारडे जड आहे. राहुल गांधी यांच्या गाजलेल्या देश पातळीवरील रॅलीमध्ये चाकोते यांचा सहभाग होता.
यार.. बंदे मे कुछ खास है.!..
सुदीप चाकोते यांनी उपस्थितांसमोर जोश पूर्ण भाषण करून हा ट्रेलर नाही, पिक्चर नाही तर ट्रेलर पूर्वीची छोटी जाहिरात आहे. असे सांगताच जोरदार टाळ्या झाल्या.
प्रणिती शिंदे यांना मी इंदिरा गांधी यांच्यानंतर आयर्न लेडी मानतो. असं कसं देत नाही.. हे वाक्य मला आवडते. असे सांगून दक्षिण विधानसभेतून मी अर्ज भरावा,यासाठी साधारण रात्री एक वाजेपर्यंत शेकडो कार्यकर्ते कार्यालयासमोर आले होते. त्यांनी आग्रह केल्यामुळे दक्षिण विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारीचा अर्ज पक्षाकडे दिला आहे. परंतु मी उत्तर विधानसभेसाठी इच्छुक आणि तयारीत आहे असे सांगितल्यावर टाळ्या आणि शिट्ट्या मोठ्या प्रमाणावर वाजल्या.
शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उत्तर साठी काही जण इच्छुक आहेत परंतु ,लास्ट इज बेस्ट असे म्हणत भर उन्हात इतकी जनता सोबत घेऊन आपण आलात त्याबद्दल तुम्हाला सलाम आहे असे उद्गार काढून चाकोते यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, युवा नेता गणेश डोंगरे, अशोक कलशेट्टी, भीमाशंकर टेकाळे, नागनाथ कदम, प्रमिला तूपलवंडे, तिरुपती परकीपंडला ,अनेक महिला पदाधिकारी, शहर, ग्रामीणमधील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.