MH 13 News Network
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दाखवणार महापालिकेत ताकद…
शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग…!
नवीन वर्षात होणाऱ्या सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पक्षाच्या जिल्ह्यातील नूतन आमदारांनी दिली. जिल्ह्यातील आमदारांनी निवडणूकीत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन ही दिले.
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत आबा पाटील यांचा सत्कार समारंभ शहर राष्ट्रवादीच्या वतीने शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, प्रवक्ते बेरिया, माजी अध्यक्ष भारत जाधव यांच्या तसेच इतर मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते डफरीन चौकातील आयएमए हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत आपला करिष्मा दाखला होता. परंतु राज्यात त्यांना यश मिळाले नाही. असे असले तरी जिल्ह्यात शरद पवार गटाचे चार आमदार निवडून आल्याने जिल्ह्यात पक्ष जिवंत राहिला आणि इथूनच मोठ्या प्रमाणावर निवडणूक आराखड्याची तयारी होणार..! अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होती.
यावेळी माजी महापौर जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, शंकर पाटील, नलिनी चंदले, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर, सुनिता रोटे, प्रतीक्षा चव्हाण या पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्ह्यातील तिन्ही नूतन आमदारांनी सोलापूर महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलताना सोलापूर शहरातील महापालिका निवडणूक आणि कोणत्याही प्रश्नासाठी आम्हाला हाक दिली त्यावेळेस आम्ही हजर राहू असे सांगितले.
मोहोळचे आमदार राजू खरे यांनी महापालिका निवडणुकीत संपूर्ण जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले. आमदार अभिजीत पाटील यांनी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, लोकांची कामे कर, आम्ही तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं.
यावेळी इतर मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी वैद्यकीय सेल प्रदेश सरचिटणीसपदी राहुल बोळकोटे आणि मीडिया सेलच्या सोलापूर शहराध्यक्षपदी शक्ती कटकधोंड यांची नियुक्ती झाल्या झाल्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत बाबर यांनी केले.
या कार्यक्रमास शहरातील पदाधिकारी गोविंद एकबोटे, अक्षय वाकसे, रेखा सपाटे, मनीषा माने, वंदना भिसे, लक्ष्मण भोसले, लता ढेरे, मोहम्मद इंडीकर, वारिस कुडले, मुसा अत्तार, बिराप्पा बंडगर, सुनील इंगळे, जावेद खैरदी, संजय जाबा, सिद्धारूढ निंबाळे, जावेद शिकलगर, सूर्यकांत शेरखाने, सुनिता दळवी, सिया मुलानी, सुप्रिया लोमटे, मोनिका सरकार, रफिक नल्लाबंधू, विष्णु शिंदे, प्रशांत भगरे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar Abhijeet Patil Raju Khare