Tuesday, August 26, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महाराष्ट्र ही नवी स्टार्टअप राजधानी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

MH 13 News by MH 13 News
6 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार
0
महाराष्ट्र ही नवी स्टार्टअप राजधानी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

‘टीआयई मुंबई हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने मुख्यमंत्री सन्मानित

mh 13 news network

मुंबई : महाराष्ट्र राज्य हे परकीय थेट गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. केवळ नऊ महिन्यांत १ लाख ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. स्टार्टअप्सच्या संख्येत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र नवीन विक्रम प्रस्थापित करत असल्याने आता भारताची नवी स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

टीआयईकॉन मुंबई यांच्यावतीने आयोजित टीआयईकॉन् मुंबई २०२५: “धंदा फर्स्ट” या देशाच्या आघाडीच्या उद्योजकीय नेतृत्व शिखर संमेलन कार्यक्रमात पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “टीआयई मुंबई हॉल ऑफ फेम” पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मंचावर टीआयई मुंबईचे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहता,  हवस मीडिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय मोहन, टीआयई मुंबईचे अध्यक्ष रानू वोहरा, डॉ. अपूर्व रंजन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी हरीश मेहता यांच्या ‘अतुलनीय’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना पुरस्कार समर्पित करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा पुरस्कार २०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केलेल्या कामाची पोचपावती आहे. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि ‘एमएमआर’ क्षेत्रात दिसणारे सर्व पायाभूत प्रकल्प, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, वाढवण प्रकल्प हे सुशासनाचे प्रतिक आहेत.

वाढवण बंदर जेएनपीटी बंदराच्या तुलनेत तीनपट मोठे असेल, जे भारतातील एक मोठे बंदर आहे. या बंदराचे काम सुरू करण्यात आले असून ते फक्त बंदर नसेल, तर त्याच्याबरोबरच एक विमानतळ देखील उभारले जाईल. त्याठिकाणी बुलेट ट्रेन स्टेशन असेल. वाढवण बंदराच्या परिसरात चौथी मुंबई साकारली जाईल.

जलसंधारण क्षेत्रात काम करताना सहा वेगवेगळ्या विभागांद्वारे १४ विविध जलसंधारण योजना राबवल्या जात होत्या. त्या एकत्र करून एकच योजना तयार केली आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून २५,००० गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवले. लोकसहभागाच्या जोरावर या अभियानातून २०१९ पर्यंत २०,००० गावांनी जलसंधारणाचे नियोजन केले, जलसाठ्याची निर्मिती केली आणि दुष्काळमुक्त झाली.  या योजनेमुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही भूजल पातळी वाढली असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आदर्श नेतृत्व

महाराष्ट्र राज्याच्या पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक वाढ आणि जलसंधारण क्षेत्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीस हे अनेक प्रकल्प, योजना राबवत आहेत. ज्यामध्ये रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि शहरी वाहतूक यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील दळणवळण आणि लोकांच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीसाठी सर्वोच्च ठिकाण म्हणून उदयास आले आहे. त्यांच्या धोरणांमुळे राज्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली असून अर्थव्यवस्थेचा विकास आणि रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळाली आहे. त्यांनी जलसंधारण आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनात अग्रणी भूमिका बजावली आहे. “जलयुक्त शिवार अभियान” या सारख्या उपक्रमांमुळे दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यास मदत झाली आहे. या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे तसेच दीर्घकालीन जलसुरक्षेला चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून ‘टीआयई’ मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अन्य पुरस्कार विजेते

पायोनियर युनिकॉर्न गुंतवणूकदार आणि नेक्सस व्हेंचर पार्टनर्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुवीर सुजान, स्टार्टअप इकोसिस्टम आणि भारतातील नवोपक्रमाचे अग्रदूत टी. व्ही. मोहनदास पै, भारतातील गुंतवणूक परिसंस्थेचा अग्रणी प्रविण गांधी, बिग बुल – पायोनियर स्टार्टअप गुंतवणूकदार आणि  केडिया सिक्युरिटीजचे संचालक डॉ. विजय केडिया, ग्राहक सेवेमध्ये परिवर्तन घडवणारा एआय स्टार्टअप – रेझो एआयचे  सह-संस्थापक आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष गुप्ता, भारताचे स्टार्टअप पॉवर कपल उद्योजक गणेश कृष्णन आणि मीना गणेश, ओवायओ चे संस्थापक आणि  मुख्य कार्यकारी अधिकरी रितेश अग्रवाल, मुंबईतील तंत्रज्ञान परिसंस्थेला चालना देणारे टेक उद्योजक संघटना मुंबई, रेनी कॉस्मेटिक्स चे  संस्थापक अशुतोष वलानी, झीप इलेक्ट्रिक चे सह-संस्थापक आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता,  एसआयडीबीआय चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मित्तल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Previous Post

होळी, धुलिवंदनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

Next Post

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी 

Related Posts

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..
महाराष्ट्र

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

20 August 2025
सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!
राजकीय

सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!

20 August 2025
‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!
महाराष्ट्र

‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!

17 August 2025
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…
राजकीय

शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…

16 August 2025
१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
महाराष्ट्र

१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार

17 August 2025
शरणू हांडे अपहरण प्रकरणी न्यायालयातून मोठी अपडेट..
गुन्हेगारी जगात

शरणू हांडे अपहरण प्रकरणी न्यायालयातून मोठी अपडेट..

12 August 2025
Next Post
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी 

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी 

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.