MH 13 NEWS NETWORK
जुळे सोलापूर HSR पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचे काम सुरू – आयुक्त डॉ. ओम्बासे यांची पाहणी

सोलापूर :
महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार जुळे सोलापूर येथील HSR पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करून ते शुद्ध करण्यात येते व त्यानंतर हे शुद्ध पाणी जुळे सोलापूर HSR येथील जमिनीवरील टाकीत साठवले जाते. सदर टाकीची साठवण क्षमता 27.5 मिलियन लिटर इतकी असून, तिची नियमित स्वच्छता महानगरपालिकेच्या वतीने केली जाते.

आज आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियंता व्यंकटेश चौबे, सतीश एकबोटे, सिद्धेश्वर उस्तरगी, श्रीशैल बाबानगरे आणि मक्तेदार श्रीकांत सोनी उपस्थित होते.