आरोग्यसेवेचा सामाजिक वसा जपत — डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयात मोफत आरोग्य शिबिर
सोलापूर – जेष्ठ नेते स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त स्व. विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व डॉ. कोठे’ज गॅस्ट्रो, लिव्हर केअर सेंटर, सोलापूर यांच्या वतीने पोलीस मुख्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या शुभहस्ते, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, गौर हसन, अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस उपायुक्त सुधीर कराडकर व डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्व. विष्णुपंत कोठे, स्व. महेश (अण्णा) कोठे व स्व. राजेश (अण्णा) कोठे यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रास्ताविक करताना डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी, “पोलीस दल सामाजिक आरोग्याचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे सांगितले. यावेळी प्रमुख अतिथींचा तसेच उपस्थित मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
शिबिरात पोट विकार, नेत्र तपासणी, दंत तपासणी, स्त्रीरोग तपासणी, हिपॅटायटिस बी-सी, मधुमेह, रक्त तपासणी, फायब्रोस्कॅन, ईसीजी आदी चाचण्या मोफत करण्यात आल्या. तसेच मानसिक आरोग्य व आहार-विहार विषयक मार्गदर्शनही देण्यात आले.
या उपक्रमाचा ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी कोठे परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत आभार मानले. आभार प्रदर्शन डॉ. राधिकाताई चिलका यांनी केले, तर सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले.
Kothe Devendra Rajesh Suryaprakash Kothe