Thursday, March 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

टोल फ्री क्रमांक १९५० मुळे नागरिकांचे शंका समाधान गतीने….

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in Blog
0
टोल फ्री क्रमांक १९५० मुळे नागरिकांचे शंका समाधान गतीने….
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने नागरिकांना एकूणच मतदान करण्याबाबत असणाऱ्या विविध शंका- तक्रारींचे निवारण करण्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक मोलाची मदत करणारा ठरला आहे. दि.१६ मार्च रोजी हा क्रमांक स्थापित करण्यात आला असून आतापर्यंत ५१४ शंका तक्रारी दूरध्वनीद्वारे तर १५ तक्रारी प्रत्यक्ष दाखल करण्यात आल्याची माहिती मतदार मदत व तक्रार निवारण कक्षाचे नोडल अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला.  मतदारांच्या सोईसाठी  १९५० हा टोल फ्री दुरध्वनी क्रमांक स्थापित करण्यात आला आहे. हा कक्ष स्थापित झाल्यापासून आजतागायत या क्रमांकावर ५१४ तक्रारी – विचारणा इ. प्राप्त झाले. त्या सर्वांचे निराकरण करण्यात आले. या शिवाय १५ जणांनी प्रत्यक्ष कक्षात दाखल होऊन आपल्या विचारणा / तक्रारी केल्या आहेत. त्यांचेही निराकरण करण्यात आले. या शिवाय नागरिक भारत निवडणूक आयोगाच्या  National Grievance Service Portal (NGSP) या पोर्टलवरही नागरिक आपल्या निवडणूक विषयक शंका विचारु शकतात, समस्या व तक्रारी नोंदवू शकतात. जिल्ह्यातून आतापर्यंत १२१ तक्रारींची नोंद होऊन त्यांचेही निरसन करण्यात आले, अशी माहिती प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

दिवसभरात या कक्षात ३० ते ४० मतदार १९५० या क्रमांकावर संपर्क साधतात. जश जशी निवडणूक प्रक्रिया जवळ येईल तसा हा आकडा वाढेल,असेही श्री. पाटील यांनी सांगितले.  नवीन मतदान नोंदणी कशी करावी? कोणता अर्ज भरावा?, मतदान कार्ड दुरुस्तीबाबत,  दिव्यांग व्यक्तिंचे मतदान, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या सुविधांची उपलब्धता अशा विविध कारणांसाठी या दुरध्वनीवर विचारणा होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके  यांच्या मार्गदर्शनात नोडल अधिकारी प्रकाश पाटील व त्यांची टीम हे काम अहोरात्र (२४X७)  करीत आहे.

Previous Post

‘गुढी पाडवा, मतदान वाढवा’

Next Post

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित..

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित..

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.