Tuesday, March 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरु होणार

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in Blog
3
दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरु होणार
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे

: प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच 47 बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांकासाठी विहीत नमुन्यातील अर्ज 13 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात येत असून 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारण्यात  येणार आहे. त्यानंतर प्राप्त अर्जांचे शुल्क स्वीकारण्याचे कामकाज सुरू करण्यात येईल. 

आकर्षक अथवा पसंती क्रमांक घेण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर क्रमांक देण्यात येणार आहे. मालिका सुरू होण्याच्या दिनांकास सकाळी 11 वाजेपर्यंत एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास आकर्षक क्रमांकासाठी विहित पद्धतीनुसार लिलाव करण्यात येईल. त्यानुसार एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सर्व अर्जदार मालिका सुरू होण्याच्या दिनांकाच्या दिवशी संबंधित क्रमांकासाठी असलेल्या मूळ रक्कमेचा धनाकर्ष संबंधित रोखपाल यांना सादर करतील. त्याच दिवशी 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत लिलाव बोलीच्या रकमेचा धनाकर्ष बंद पाकिटात संबंधित रोखपालाकडे सादर करावा लागणार आहे. या बंद पाकिटातील धनाकर्ष नोंदणी प्राधिकाऱ्यांसमोर उघडले जाऊन सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास आकर्षक अथवा पसंती क्रमाक देण्यात येईल. अर्जदाराने 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत बोली रकमेचा बंद पाकिटातील धनाकर्ष जमा केला नाही, तर सदर क्रमांक दुसऱ्या अर्जदारास देण्यात येईल, असे बोरीवलीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम कासार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Previous Post

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता मुंबईच्या पायाभूत सुविधांतील पुढचे पाऊल

Next Post

वीरशैव लिंगायत कन्नड भवनाला 25 लाखांचा निधी..

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
वीरशैव लिंगायत कन्नड भवनाला 25 लाखांचा निधी..

वीरशैव लिंगायत कन्नड भवनाला 25 लाखांचा निधी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.