MH 13NEWS NETWORK
देवेंद्र कोठेंच्या पदयात्रेने मोदी परिसर झाला ‘ मोदीमय ‘पदयात्रेला तुफान प्रतिसाद : महिलांची मोठी उपस्थिती सोलापूर :
मध्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी पद यात्रेच्या सुरुवातीस हनुमंताची पूजा करून मोदी परिसर अक्षरशः पिंजून काढला. मोदी परिसर मोदीमय झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
मंगळवारी सकाळी मोदी आणि परिसरात ही पदयात्रा निघाली.प्रारंभी मसीहा चौक येथील मंदिरात श्री हनुमंताची पूजा करण्यात आली. यानंतर पदयात्रेस प्रारंभ झाला. भारतमाता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, देवेंद्र कोठे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा नागरिकांकडून देण्यात येत होत्या.
मसीहा चौक येथून सुरू झालेली ही पदयात्रा नरसिंह नगर, चिंतलवार वस्ती, पाच कंदील गणपती मंदिर, शिवाजी नगर, शामा नगर, जय हिंद व्यायाम शाळा, जगजीवन राम झोपडपट्टी, सात रस्ता, जगदंबा चौकमार्गे रोटे कॉम्प्लेक्स येथे विसर्जित झाली. या पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे शेले, टोप्या परिधान करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा घेऊन उत्साही सहभाग नोंदवला.
माजी नगरसेविका मीनाक्षी कंपल्ली, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते राम तडवळकर, शक्ती केंद्रप्रमुख शर्वरी रानडे, अविनाश बेंजरपे, मंडल अध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, शहर चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, सुरेश मोडे यांनी सहभाग नोंदवला.
तर पक्षाचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जाणारे प्रकाश बंडगर, निशिकांत खेडकर, मारेप्पा कंपली, बाबूराव संगेपांग, जिद्दी ग्रुपचे संस्थापक सुनील म्हेत्रे, बाबू उपलकार, रतीकांत कमलापुरे, शिवसेना उपशहरप्रमुख दिपक पाटील विशाल कल्याणी, हणमंतू कोळी, हरीकृष्ण मुदगल, सचिन गुंतलू, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष कुमार जंगडेकर, गणेश हलसगी, राजू अल्कोड, शिवा गुदपे, सन्मित्र काटकर, सोमा काटकर, रुपेश जक्कल, संजय जंगडेकर आदी उपस्थित होते.