आ. सुभाष देशमुख यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोलापूर कर्नाटक, हिमाचल प्रदेश येथील कॉंग्रेस सरकारने महिलांना फसवले. महाराष्ट्रात महायुतीने लाडकी बहीण योजना चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे विरोधक घाबरले आहेत. आता आगामी काळात योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे महिलांना दरमहा 2100 रुपये मिळतील.
आमदार सुभाष देशमुख यांचे मतदारसंघातील काम मी जवळून पाहिले आहे मतदारसंघाच्या प्रगतीसाठी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
हत्तरसंग कुडल येथे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. सुभाष देशमुख यांच्या प्रचार शुभारंभ दानवे यांच्या हस्ते झाला, त्यावेेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कर्नाटकातील राज्यसभेचे खासदार इराण्णा कडाडी, आ. देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, तालुकाध्यक्ष संगपा केरके, माजी जिल्हाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, राम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दानवे म्हणाले की, कॉंग्रेसने देशावर जवळपास 60 वर्ष राज्य केले पण शेतकर्यांना कधी 12 रुपये पाठवले नाहीत. भाजपाने पी.एम. किसान योजना राबवली.
आता या योजनेत वाढ केली जाणार करून ती पंधरा हजार रुपये केले जाणार आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्यांनी बजेटमध्ये शेतकर्यांना न्याय दिला आहे. आ. सुभाष देशमुख म्हणाले की, मंद्रूप एमआयडीसी रद्द करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे.
पण तरुणांच्या कल्याणासाठी मी एमआयडीसी उभी करणारच आहे. 35 वर्षांपासून रखडलेल्या वडापूर बॅरेजला मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे आगामी काळात मतदार संघात सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कुडलच्या श्री संगमेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 173 कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे.
तालुक्याच्या विकासासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. कर्नाटकातील राज्यसभेचे खासदार किरणा कडाडी, म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात क्रांतीकारक बदल होत आहेत. त्याप्रमाणेच या मतदारसंघाचा प्रगतीसाठी सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा विजयी करावे. यावेळी तालुका अध्यक्ष संघप्पा केरके यांनीही देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, डॉ. हवीनाळे, मळसिद्ध मुगळे, जगन्नाथ गायकवाड, श्रीनिवास करली, आप्पासाहेब मोटे, गौरीशंकर मेंडगुदले, नामदेव पवार, आनंद बिराजदार, मळेवाडी काका, हनुमंतराव कुलकर्णी, निलिमा शितोळे, तालुका महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पाटील, वृषाली पवार यांचे सह मतदार संघातील महायुतीचे पदाधिकारी, सरपंच उपसरपंच उपस्थित होते. सूत्रसंचालन यतीन शहा यांनी केले.
देशमुखांना मंत्री करण्याची जबाबदारी माझीः दानवे
दक्षिण तालुक्याचा विकास 10 वर्षात आ. देशमुख यांनी केल्याचे दिसत आहे. मतदारसंघाच्या आणखी प्रगतीसाठी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवा, त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी राहिल, असेही दानवे म्हणाले.