Wednesday, August 27, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘दक्षिण’च्या प्रगतीसाठी पुन्हा आ. देशमुख..! माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं आवाहन

MH13 News by MH13 News
10 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
‘दक्षिण’च्या प्रगतीसाठी पुन्हा आ. देशमुख..! माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं आवाहन
0
SHARES
35
VIEWS
ShareShareShare

आ. सुभाष देशमुख यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोलापूर कर्नाटक, हिमाचल प्रदेश येथील कॉंग्रेस सरकारने महिलांना फसवले. महाराष्ट्रात महायुतीने लाडकी बहीण योजना चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे विरोधक घाबरले आहेत. आता आगामी काळात योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे महिलांना दरमहा 2100 रुपये मिळतील.

आमदार सुभाष देशमुख यांचे मतदारसंघातील काम मी जवळून पाहिले आहे मतदारसंघाच्या प्रगतीसाठी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

हत्तरसंग कुडल येथे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. सुभाष देशमुख यांच्या प्रचार शुभारंभ दानवे यांच्या हस्ते झाला, त्यावेेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कर्नाटकातील राज्यसभेचे खासदार इराण्णा कडाडी, आ. देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, तालुकाध्यक्ष संगपा केरके, माजी जिल्हाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, राम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दानवे म्हणाले की, कॉंग्रेसने देशावर जवळपास 60 वर्ष राज्य केले पण शेतकर्‍यांना कधी 12 रुपये पाठवले नाहीत. भाजपाने पी.एम. किसान योजना राबवली.

आता या योजनेत वाढ केली जाणार करून ती पंधरा हजार रुपये केले जाणार आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्यांनी बजेटमध्ये शेतकर्‍यांना न्याय दिला आहे. आ. सुभाष देशमुख म्हणाले की, मंद्रूप एमआयडीसी रद्द करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे.

पण तरुणांच्या कल्याणासाठी मी एमआयडीसी उभी करणारच आहे. 35 वर्षांपासून रखडलेल्या वडापूर बॅरेजला मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे आगामी काळात मतदार संघात सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कुडलच्या श्री संगमेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 173 कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे.

तालुक्याच्या विकासासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. कर्नाटकातील राज्यसभेचे खासदार किरणा कडाडी, म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात क्रांतीकारक बदल होत आहेत. त्याप्रमाणेच या मतदारसंघाचा प्रगतीसाठी सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा विजयी करावे. यावेळी तालुका अध्यक्ष संघप्पा केरके यांनीही देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, डॉ. हवीनाळे, मळसिद्ध मुगळे, जगन्नाथ गायकवाड, श्रीनिवास करली, आप्पासाहेब मोटे, गौरीशंकर मेंडगुदले, नामदेव पवार, आनंद बिराजदार, मळेवाडी काका, हनुमंतराव कुलकर्णी, निलिमा शितोळे, तालुका महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पाटील, वृषाली पवार यांचे सह मतदार संघातील महायुतीचे पदाधिकारी, सरपंच उपसरपंच उपस्थित होते. सूत्रसंचालन यतीन शहा यांनी केले.

देशमुखांना मंत्री करण्याची जबाबदारी माझीः दानवे

दक्षिण तालुक्याचा विकास 10 वर्षात आ. देशमुख यांनी केल्याचे दिसत आहे. मतदारसंघाच्या आणखी प्रगतीसाठी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवा, त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी राहिल, असेही दानवे म्हणाले.

Tags: solapurSolapur MaharashtraSouth solapurSubhash Deshmukhदक्षिण मतदार संघदक्षिण विधानसभा मतदारसंघ
Previous Post

हनुमंताची पूजा करून ‘मोदी’मय केला मोदी परिसर ; देवेंद्र कोठे यांना वाढता प्रतिसाद..

Next Post

‘विकासा’च्या मुद्द्याचं बोला..! भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठे यांचे शक्तिप्रदर्शन

Related Posts

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..
महाराष्ट्र

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

20 August 2025
सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!
राजकीय

सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!

20 August 2025
‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!
महाराष्ट्र

‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!

17 August 2025
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…
राजकीय

शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…

16 August 2025
१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
महाराष्ट्र

१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार

17 August 2025
ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…
सामाजिक

ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…

15 August 2025
Next Post
‘विकासा’च्या मुद्द्याचं बोला..! भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठे यांचे शक्तिप्रदर्शन

'विकासा'च्या मुद्द्याचं बोला..! भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठे यांचे शक्तिप्रदर्शन

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.