अभंग, भजन, भारूड गात — ‘चिमुकल्यांची वारी, गुरुकुलच्या दारी’ जैन गुरुकुलात रंगला भक्तिभावपूर्ण रिंगण सोहळा
सोलापूर (प्रतिनिधी) – श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत ‘चिमुकल्यांची वारी, गुरुकुलच्या दारी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. राजकुमार काळे होते.
उपमुख्याध्यापक श्री. शैलेश पांगळ, पर्यवेक्षक श्री. प्रवीण कस्तुरे, शिक्षकवृंद व पालकांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजन करून करण्यात आली.

नंतर विद्यार्थ्यांच्या वेशभूषेसह दिंडीने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण केले. मैदानावर रिंगण करत विद्यार्थ्यांनी ‘फेर’ धरला. पताका, टाळकरी व तुळस घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी रिंगण पूर्ण केले.कार्यक्रमात विविध गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली
:संकल्प पुजारी (७वी) – हनुमान चालीसा सादरश्रावणी हंगरगे व शुभ्रा बिराजदार (५वी) – अभंग सादरीकरणनक्षत्रा लोखंडे (१०वी) – “हरिभजनाविण काळ घालवू नको रे” गीत सादरभूमी मोरे, भार्गवी बोडा, रिया शिंदे (६वी) – “मला बाई जायाचं शाळेला” हे भारूड सादर

या सर्व सादरीकरणांना ऋषिकेश जाधव, वेदांत कोरे, कृष्णा माळवदकर, ओजस फटाले या विद्यार्थ्यांनी वाद्यसंगती दिली.कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी फुगडी खेळत पारंपरिक आनंद लुटला. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.