MH 13News Network
व्हिडीओ व्हायरल प्रकरणात ॲड. योगेश पवार यांना अंतरिम अटकपूर्व जामीन
सोलापूर (प्रतिनिधी):
माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर दाखल विनयभंगाच्या प्रकरणातील एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केल्याप्रकरणी ॲडवोकेट योगेश पवार यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी योगेश पवार यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.फेसबुकवर व्हिडीओ प्रसारित केल्यामुळे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे API अजित पाटील यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 464/2025 अन्वये आयटी ॲक्टच्या कलम 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
अटकेची शक्यता लक्षात घेता ॲड. पवार यांनी ॲड. डी. एन. भडंगे यांचेमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.या अर्जावर आज (दि. 3 जुलै) सुनावणी झाली. सरकार पक्षाने जामिनास तीव्र विरोध केला असतानाही, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत तपास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली.
तसेच 15,000 रुपयांच्या पीआर बॉण्डवर, तपास अधिकारी बोलावतील तेव्हा उपस्थित राहणे आणि तपासात सहकार्य करण्याच्या अटींवर ॲड. पवार यांना 8 जुलै 2025 पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.या प्रकरणात ॲड. योगेश पवार यांच्यातर्फे ॲड. डी. एन. भडंगे व ॲड. एन. एन. भडंगे यांनी काम पाहिले.