MH 13NEWS NETWORK
सोलापुरातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आला आहे. यंदाच्या निवडणुकीत तगडी फाईट होण्याचे चित्र स्पष्ट होत आहे. वंचित बहुजन आघाडीने अक्कलकोट तालुक्यात व्हिजन असणारा सर्वसामान्यांचा चेहरा उतरवला आहे. संतोष इंगळे हे उद्योजक असून अक्कलकोट साठी माझे व्हिजन तयार आहे. निवडणुकीसाठी मी संपूर्ण सज्ज असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष इंगळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की प्रगती समाजाची व्हायची असेल तर जातीपातीच्या पलीकडे राजकारण होणे गरजेचे आहे. तालुक्यात युवकांना रोजगाराची मोठी संधी आहे. हजारो तरुण पुणे, मुंबई ,हैदराबाद, कर्नाटक या ठिकाणी रोजगारासाठी जात असतात. हे स्थलांतर रोखून गावातल्या तरुणाला गावातच रोजगार देण्याचे माझे नियोजन आहे.
कुटुंब व्यवस्था चांगली राहिली तरच समाज हा निकोप आणि सुदृढ राहतो. यावर माझा विश्वास आहे. तालुक्यातील कोणत्याही कुटुंबातील युवक- युवतींना रोजगारांसाठी कोठेही भटकावे लागू नये यासाठी माझी टीम आणि मी सर्वे केलेला आहे. त्यानुसार भविष्यात नोकरीच्या संधी मोठ्या निर्माण होतील.
अक्कलकोट तालुक्यावर लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे असे असतानाही श्री बसवेश्वर महाराजांचा पुतळा किंवा स्मारक या ठिकाणी निर्माण झाली नाही हे खेदाची बाब आहे. मी निवडून आल्यानंतर बसवेश्वरांचे मोठे स्मारक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना इंगळे पुढे म्हणाले की, महिला सक्षमीकरण हा समाजाचा पाया आहे. केवळ लाडकी बहीण या नावाने योजना काढून फायदा होणार नाही. त्यासाठी महिलांना रोजगार तसेच गृह उद्योग निर्माण करण्याच्या संधी आहेत. त्यासाठी मी प्रयत्नशील असेन.अक्कलकोट एमआयडीसी पुनर्जीवित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे, रमेश बनसोडे, रविराज कोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.