MH 13 News Network
शहराच्या विकासासाठी कार्यक्षम अशा देवेंद्र कोठे यांना बहुमताने निवडून द्यावे : किसन जाधव
सोलापूर – महायुती मधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य श्री किसन भाऊ जाधव यांची सोलापूर शहर मध्यचे भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय (A) महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री देवेंद्र राजेश कोठे यांनी आज सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी इच्छा भगवंताची समूहाचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव व धडाडीचे नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त करताना श्री किसन जाधव म्हणाले, स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे सोलापुरच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. त्यांचीच कार्यपद्धती अवलंबणारे देवेंद्र कोठे यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांची कार्यक्षमता आणि तत्परता सिध्द केली आहे.
त्यांच्यासारखा सक्षम उमेदवारच शहराचा सर्वांगीण विकास करू शकतो याची खात्री वाटते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व जाधव मित्रपरिवार यांच्या वतीने उमेदवार देवेंद्र कोठे यांचा नगरसेवक श्री नागेश अण्णा गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करून शुभेच्छा व्यक्त केल्या. देवेंद्र कोठे यांनी देखील श्री किसन भाऊ जाधव आणि श्री नागेश अण्णा गायकवाड यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
याप्रसंगी अंबादास मामा गायकवाड, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश आण्णा गायकवाड, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव साहेब, अभिजीत कदम सर किरण शिंदे, अमोल जगताप, सचिन राऊत, विक्रांत गजु शिंदे, माऊली जरग ,हुलगप्पा शासम, माणिक कांबळे, महादेव राठोड, शितल शिरसागर, श्रीशैल चौगुले, पवन बेरे , ऋषब प्याटी,व उपस्थीत ईच्छा भगवंताची मित्रपरिवार चे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.