महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर!
मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यांचे प्रभागनिहाय वाटप करण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरक्षण सोडतीसंदर्भातील वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे

👇महत्त्वाच्या तारखा:
• 30 ऑक्टोबर – 4 नोव्हेंबर: आरक्षित जागांचा प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी •
8 नोव्हेंबर: आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रात
• 11 नोव्हेंबर: आरक्षण सोडतीचा दिवस •
17 नोव्हेंबर: प्रारूप आरक्षण प्रसिद्धी •
24 नोव्हेंबर: हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख
• 25 नोव्हेंबर – 1 डिसेंबर: हरकतींचा विचार व अंतिम आरक्षणाचा निर्णय
• 2 डिसेंबर: अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध
या प्रक्रियेनंतर राज्यातील महापालिका निवडणुकांची तयारी वेगाने सुरू होणार असून, स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना गती मिळणार आहे.
#MaharashtraElections #MunicipalElections #ReservationDraw #StateElectionCommission #LocalBodyPolls #MaharashtraNews #ElectionUpdate









