Saturday, August 30, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेले २२ कोटींचे रोख बक्षिस खेळाडूंच्या कष्टाला दिलेली दाद – उपमुख्यमंत्री अजित पवार

mh13news.com by mh13news.com
5 hours ago
in Blog
0
राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेले २२ कोटींचे रोख बक्षिस खेळाडूंच्या कष्टाला दिलेली दाद – उपमुख्यमंत्री अजित पवार
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

पदकविजेत्यांच्या गौरवाने पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा, मिशन लक्ष्यवेध योजनेस प्रारंभ

MH 13 NEWS NETWORK

  • राज्याचे नवे क्रीडा धोरण लवकरच जाहीर करणार – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
  • शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय साकारणार

पुणे“राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेली २२ कोटींची रोख बक्षिसे ही त्यांच्या कष्टाला दिलेली खरी दाद आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल गजबजून गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील ३३१ विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. या खेळाडूंना एकूण २२ कोटी ३१ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते १३ आंतरराष्ट्रीय व ३१८ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ७ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. कार्यक्रमात “मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर” या महत्वाकांक्षी योजनेच्या लोगोचे अनावरणही उपमुख्यमंत्री पवार आणि क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे, आमदार बाबाजी काळे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, माजी क्रीडा प्रशासक नामदेव शिरगांवकर, प्रशिक्षक संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक झळकावले आहे, जे राज्याच्या क्रीडा परंपरेला अभिमानास्पद आहे. “खेळाडूंच्या मेहनतीतून राज्याला मिळालेले यश हे १३ कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे सामूहिक अभिमानाचे कारण आहे. खेलो इंडियासह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या ५८ कोटींच्या निधीच्या मागणीस तात्काळ मंजुरी दिली आहे. खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा देऊन महाराष्ट्राने ऑलिम्पिकसह जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण करावे, हे आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी नमूद केले.

त्यांनी पुढे सांगितले की, बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे संग्रहालय केवळ खेळाडूंच्या कामगिरीचा ऐतिहासिक दस्तऐवज नसून, नवीन पिढीला प्रेरणा देणारे व खेळात शिस्त, मूल्ये व संस्कार रुजवणारे केंद्र ठरणार आहे.

क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, “आरोग्यदायी, क्रीडामय महाराष्ट्र हे आमचे ध्येय आहे. राज्याचे नवीन क्रीडा धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल. हे धोरण खेळाडूंना न्याय देणारे व त्यांच्या प्रगतीस चालना देणारे असेल. त्यातून महाराष्ट्राचे खेळाडू आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अधिकाधिक पदके जिंकतील.”

फेब्रुवारीत उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके पटकावून प्रथम क्रमांक मिळविला होता. या यशाचे स्मरण करत राज्य सरकारने ३१८ राष्ट्रीय विजेते व १३ आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडूंचा गौरव केला. राज्याच्या क्रीडा धोरण २०१२ नुसार खेळाडू व मार्गदर्शकांना एकूण २८ कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली.

दरम्यान, वार्षिक १६० कोटी रुपये खर्च असलेल्या “मिशन लक्ष्यवेध” या महत्वाकांक्षी योजनेचाही शुभारंभ आज झाला. पहिल्या टप्प्यात ॲथलेटिक्स, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस या सहा क्रीडा प्रकारांना प्राधान्य देण्यात आले असून उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक उपकरणे व तज्ज्ञ प्रशिक्षकांची मदत खेळाडूंना देण्यात येईल. या योजनेमुळे महाराष्ट्राचे खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमध्ये सराव करून जागतिक स्तरावर पदके जिंकण्याची संधी मिळेल.

क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राज्यातील क्रीडा विकासाची पार्श्वभूमी, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा उल्लेख केला. आभारप्रदर्शन सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले.

०००

Previous Post

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Next Post

मराठा समाज वंशावळ समितीला सरकारची मुदतवाढ – ३० जून २०२६ पर्यंत विस्तार

Related Posts

सिंहगड कॉलेज प्राणघातक हल्ला प्रकरणी संजय उपाडे यास जामीन मंजूर
Blog

शेतकरी आत्महत्येस प्रवृत्ती प्रकरणात दोन सावकारांची निर्दोष मुक्तता..

19 August 2025
देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!
Blog

देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!

7 August 2025
वैभव वाघे खून प्रकरण: पुरवणी दोषारोपपत्र दाखल; जेल बदलाचा अर्ज मागे
Blog

वैभव वाघे खून प्रकरण: पुरवणी दोषारोपपत्र दाखल; जेल बदलाचा अर्ज मागे

7 August 2025
नवउद्योजकतेला नवे वारे; पुढील पिढीला दिशा मिळतेय
Blog

नवउद्योजकतेला नवे वारे; पुढील पिढीला दिशा मिळतेय

6 August 2025
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित..
Blog

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित..

29 July 2025
अक्कलकोटमध्ये खळबळजनक प्रकार : प्रवीण गायकवाड यांना काळं फासून मारहाण
Blog

अक्कलकोटमध्ये खळबळजनक प्रकार : प्रवीण गायकवाड यांना काळं फासून मारहाण

13 July 2025
Next Post
मराठा समाज वंशावळ समितीला सरकारची मुदतवाढ – ३० जून २०२६ पर्यंत विस्तार

मराठा समाज वंशावळ समितीला सरकारची मुदतवाढ – ३० जून २०२६ पर्यंत विस्तार

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.