नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी | रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यू-अपघातांवर नुकसानभरपाईसाठी समिती स्थापन..
सोलापूर / प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयात दाखल लोकहित याचिका क्र. 71/2013 ची सुनावणी दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न झाली. या सुनावणीदरम्यान रस्त्यांवरील खड्डे आणि उघड्या मॅनहोलमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारींचा गंभीरपणे विचार करण्यात आला.

त्यानुसार रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यू अथवा अपघातांवर नुकसान भरपाईसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने रस्त्यांवरील खड्डे किंवा उघड्या मॅनहोलमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास मृतांच्या कायदेशीर वारसांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच जखमी व्यक्तींनाही त्यांच्या दुखापतीच्या स्वरूप आणि गंभीरतेनुसार भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.याच अनुषंगाने नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीत —आयुक्त, सोलापूर महानगरपालिका – अध्यक्ष,
सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर
सदस्य,तसेच अन्य संबंधित अधिकारी यांचा समावेश आहे
.ही समिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक कार्यवाही करून नुकसानभरपाईच्या प्रकरणांवर योग्य निर्णय घेणार आहे.
Solapur Municipal Corporation, Solapur CMOMaharashtra









