mh 13 news network
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील इच्छुक उमेदवारांसाठी शिवसेना शहर जिल्हा कार्यालय, सोलापूर येथे अर्ज वाटप कार्यक्रमास दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत सुरुवात करण्यात आली.\

शिवसेना कार्यालय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, शहरातील विविध भागांतील असंख्य इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात उपस्थित राहून इच्छुक उमेदवारी अर्ज स्वीकारले. यावेळी कार्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना संघटनात्मक तयारीला लागली असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून योग्य उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आगामी काळात पक्षाकडून उमेदवारांची छाननी करून अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार आहे.

या अर्ज वाटप कार्यक्रमामुळे सोलापूर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येत असल्याचे स्पष्ट होत आहे.








