जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
सोलापूर, दिनांक 12 जुलै 2025 – सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट प्रशासकीय बांधिलकीचे उदाहरण सर्वसामान्यांसाठी पुढे आणले आहे.
दिनांक 14 जुलै ते 18 जुलै 2025 या एका आठवड्यासाठी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना भेट देण्याची घोषणा केली आहे. या भेटीद्वारे नागरिकांना त्यांच्या समस्या, विनंत्या आणि सूचना थेट जिल्हाधिकारी यांना मांडण्याची संधी मिळणार आहे.

यापूर्वी पंढरपूर येथील आषाढी वारीच्या तयारीमुळे सोमवारी आणि शुक्रवार या दोन दिवसांच्या भेटी रद्द केल्या होत्या.
परंतु, 14 जुलै ते 18 जुलै दरम्यान ते दररोज उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे.