◼️उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील महापुर व अतिवृष्टीमुळे सिना-भिमा काठच्या गावातील पडलेले पोल उभे करुन शेतीपंप सुरू करा.
सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गांव वसल्यापासुन २० वेळा महापुराचे विळख्यात सापडले असुन या गावचे अन्यस्त्र स्थलांतर करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. तसेच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी, सततच्या पाऊस व महापुरामुळे पडलेले इलेल्ट्रीक पोल उभे करुन, डिपी बदलून शेतीपंपाचा विज पुरवठा त्वरीत सुरू करण्याची मागणी माजी आमदार दिलीपराव माने व सिध्दनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने यांनी विज वितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल माने यांच्याकडे केली.

यावेळी प्रशासनाकडून पडलेले पोल लवकर उभे करून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगण्यात आले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी हे सिना नदीकाठी असलेले गांव, वसलेपासुन २० वेळा महापुराच्या विळख्यात सापडले आहे. यावर्षी आलेला महापुर सर्वाधिक भयानक होता. याची प्रचिती पुन्हा नको यासाठी शिवणी गावाचे शासकीय उपलब्ध जागेत पुर्नवसन करण्याची मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे माजी आमदार दिलीपराव माने यांनी केली. यावेळी त्यांनी शिवणी गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरीकांशी सविस्तर चर्चा करून योग्य माहितीसह प्रस्ताव शासनाकडे पाठवू असे सांगीतले.
उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व महापुरामुळे सिना, भिमा नदीकाठच्या गावांतील नागरीक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून या भागातील विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडल्याने व डिपी पाण्यात गेल्याने नादुरूस्त झाले आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठचे पाकणी पासून शिवणी, तिऱ्हे, पाथरी, तेलगाव, डोणगाव, कवठे, नंदुर, समशापूर ते दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेवटचे गावापर्यंत पडलेले पोल उभे करुन, डीपी बदलुन शेतीपंपाचा विज पुरवठा सुरू करण्याची मागणी वीज वितरनचे अधिक्षक अभियंता सुनिल माने यांच्याकडे माजी आमदार दिलीपराव माने व सिध्दनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने यांनी केली.
अतिवृष्टी व महापुरामुळे वीज वितरणाचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असून अशा परिस्थितीत गावातील वीजपुरवठा तातडीने सुरू केला तर आवश्यक साधनसामग्री व कर्मचारी वर्गांना घेऊन पडलेले पोल उभे करून वीज पुरवठा लवकर सुरू करण्याचे आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे अधिक्षक अभियंता सुनील माने यांनी चर्चे वेळी सांगितले.
यावेळी सोमनाथ गायकवाड, गोवर्धन जगताप, अशोक गुंड, रवींद्र शिंदे, अजय सोनटक्के, संजय राठोड, उद्धव बंडगर, शिवाजी पाटील, म्हाळप्पा बंडगर, अक्षय गायकवाड, ओंकार केंगार, बालाजी गायकवाड, बंडा आवताडे, बन्सी मेटे, प्रदीप सुरवसे, बालाजी गायकवाड, गणपत बचुटे, नितीन भोपळे, बापू गुंड, ज्ञानेश्वर साखरे, सागर वाघमोडे, प्रभाकर गुंड, आदीसह या भागातील शेतकरी उपस्थित होते.
वीज मंडळ प्रशासनाचे कौतुक..
सोलापूर जिल्ह्यात यावेळी झालेली अतिवृष्टी सततचा पाऊस व महापुरामुळे नदीकाठचे गावातील वीजपुरवठा खंडित झाला. मात्र प्रशासनाने पडत्या पावसात गावातील वीजपुरवठा सुरू केला व शेतीपंपाचे वीज पूर्ववत करण्यासाठी करीत असलेला कामाची दिलीपराव माने यांनी प्रशंसा केली.
Dilip Bramhdev Mane








