महेश हणमे / MH 13news Network
छत्रपती संभाजी राजे चौक म्हणजे सोलापूरचे प्रवेशद्वार असून हा रस्ता नेहमी वादाचा ठरलेला आहे. या ठिकाणचे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने या ठिकाणी वाहनधारकांची अक्षरशः घसरगुंडी होत होती. अनेक वाहनधारक जखमी झाल्याची बातमी एमएच १३ न्यूज च्या माध्यमातून दाखवण्यात आली त्यावर महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आज शुक्रवारी युद्ध पातळीवर त्या रस्त्याचे काम सुरू केले आहे.
छत्रपती संभाजी राजे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुख्य रस्ता असून अनेक ठिकाणी खड्डे ,धूळ यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.
याच रस्त्याने हजारो वाहने जात तात्पुरत्या स्वरूपामध्ये ठिगळपट्टी महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती.
रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे अनेक वाहनधारक घसरून पडत असल्याची लाईव्ह दृश्य एमएच १३ न्यूजच्या माध्यमातून दाखवण्यात आली. यावर नगर अभियंता आणि महापालिका प्रशासनाने बातमीची तात्काळ दखल घेऊन आज शुक्रवारी रात्री कामाला सुरुवात केली आहे.