MH13 News | सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर भाजपमध्ये अंतर्गत वादाने ठिणगी पेटली असून हा वाद आता थेट मुंबईपर्यंत पोहोचला आहे. सोलापूर शहरातील भाजप कार्यालयासमोर आंदोलन आणि घोषणाबाजी झाल्यानंतर आज दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी थेट मुंबई गाठली. भाजप प्रदेश कार्यालयात थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर आपली नाराजगी व्यक्त करत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या प्रवेशाबाबत विरोध दर्शवला आहे.

ही भेट माजी आमदार दिलीप माने यांच्या संभाव्य पक्षप्रवेशा विरोधात झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट वाटपाच्या वेळी आमच्यावर अन्याय होऊ नये, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या शिष्टमंडळाची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेत अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.या शिष्टमंडळात हनुमंत कुलकर्णी, विशाल गायकवाड, शिवराज सरतापे, संगाप्पा केरके, महेश देवकर, अर्जुन जाधव, अतुल गायकवाड, प्रशांत कडते, यतीन शहा आणि सचिन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उद्या बुधवारी मुंबईत पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम होणार असून,मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांचे पुत्र, माजी आमदार यशवंत माने, सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे, तसेच माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Subhash Deshmukh Dilip Bramhdev Mane Ajinkyarana Rajan Patil Sachin Kalyanshetti Jaykumar Gore CMOMaharashtra 🔖 #SolapurPolitics #BJP #RavindraChavan #DilipMane #RajanPatil #MH13News #SolapurSouth #BJPConflict









