“पाण्याची बचत, उत्पादनात वाढ! ठिबक व तुषार सिंचनासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी”
सोलापूर / प्रतिनिधी
दि. ३१ — महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचनासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
या योजनेअंतर्गत ३ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विशेष अर्ज मोहिम राबविण्यात येणार आहे.

पात्र शेतकऱ्यांनी या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.श्री. भोसले यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून ठिबक व तुषार सिंचन सुविधांचा लाभ घ्यावा, ज्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनवाढ साधता येईल.
#महाडीबीटी #ठिबकसिंचन #तुषारसिंचन #प्रतिथेंबअधिकपीक #सोलापूरकृषिविभाग #MH13News








