MH13NEWS Network
सोलापूर : प्रतिनिधी
पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बाळू दादा जाधव (रा. सावळेश्वर, ता. मोहोळ) यास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.सावळेश्वर येथे पत्नी स्वाती जाधव हिचा चरित्राच्या संशयावरून लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याचा आरोप बाळू जाधव याच्यावर ठेवण्यात आला होता.
या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.सोलापूर सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाल्यानंतर, आरोपीचा मुलगा प्रकाश जाधव याने आपल्या वडिलांविरुद्ध साक्ष दिली होती.
त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवून न्यायालयाने बाळू जाधव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.सदर शिक्षेविरोधात आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

अपीलासोबत दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली.खंडपीठाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आणि त्याच्या जामिनावर मुक्ततेचे आदेश दिले.
या प्रकरणात उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने, तर सरकारतर्फे ॲड. ए. ए. नाईक यांनी काम पाहिले.
📍#SolapurCrime #HighCourt #KolhapurBench #BailGranted #MoholPolice #MurderCase #MH13News









