Live | मराठा क्रांती मोर्चाचा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात एल्गार..!
सोलापूर/ प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज संस्थेच्या तसेच प्रशालेच्या अध्यक्षपदावरून माजी महापौर मनोहर सपाटे याची हकालपट्टी करण्यासाठी आज सोलापुरातील फडकुले सभागृह येथे मराठा क्रांती मोर्चाची महत्वपूर्ण बैठक सुरू आहे.

एका महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी समाज माध्यमांमधून एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत सपाटे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेवर गेल्या 30 हून अधिक वर्ष अध्यक्ष असलेल्या सपाटेमुळे प्रशालेची, त्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून अध्यक्ष पदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि समाज बांधवांनी निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये तातडीची बैठक आयोजित केली आहे.

यावेळी समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत.

यावेळी याच संस्थेतील काही शिक्षकांनी सपाटे यांच्या कारभाराची चिरफाड केली आहे.
बातमी याच ठिकाणी अपडेट होत राहील..!