मुंबई | प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तसेच सोलापूर जिल्ह्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात संभाव्य उमेदवार, पक्षाचे संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांशी संवाद आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अभिजित पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख आणि जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील उपस्थित होते.

या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी निवडणुकांसाठीची रणनीती निश्चित करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Sharad Pawar Dhairyasheel Mohite Patil Abhijeet Patil Ncp Youth Official #NCP #SharadPawar
#SupriyaSule #SolapurPolitics #MaharashtraPolitics #LocalElections #NCPUpdates #Rajkaran #SharadchandraPawar #RashtravadiCongress #SolapurDistrict #PoliticalMeeting









