MH 13 News Network
पाकणी येथे कॉर्नर बैठक तालुक्याच्या विकासासाठी महायुती सरकार पुन्हा आणावे- आमदार सुभाष देशमुख यांचे आवाहन
सोलापूर राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून तालुक्याला हजारो कोटींहून अधिक निधी मिळाला आहॆ.हे सरकार सर्व समाज घटकांचा विचार करणारे आहेत. त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार आणावे आणि मला पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
पाकणी येथे कॉर्नर बैठक घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांशी संवाद साधत मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करताना आ. देशमुख बोलत होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष राम जाधव, वृषाली पवार,सुनील गुंड,शोभा गुंड,सर्जेराव पाटील,सोनूपंत येलगुंडे, सूर्यकांत येलगुंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक अनेक तरुणांनी भाजपात प्रवेश केला. आ. देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपशी एकनिष्ठ राहून काम करण्याचे आश्वासन यावेळी कार्यकर्त्यांनी दिले.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांचा सन्मान केला आहे.महायुती सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर या रकमेत पुन्हा वाढ केली जाणार आहे. याशिवाय सरकारने शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गांसाठीही अनेक योजना आणल्या आहेत त्यामुळे महायुती सरकार हे कायम सर्व समाज घटकांचे काम पाहणारे सरकार आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे पुन्हा एकदा जनतेने महायुती सरकारच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
यावेळी सोनूपंत येलगुंडे, सूर्यकांत येलगुंडे ,विश्वनाथ येलगुंडे, संजय सुरवसकर,राजेंद्र सुरवसकर,बालाजी शिंदे,बालाजी येलगुंडे, केशव सुरवसकर,केशव पारेकर,बापू खांडेकर, विजय खांडेकर, अजित सुरवसकर,कृष्णा साठे,राहुल शिंदे,निलेश येलगुंडे,ज्ञानेश्वर सुरवसकर,अमोल येलगुंडे, परमेश्वर येलगुंडे, गजानन येलगुंडे, गणेश मोरे,अक्षय येलगुंडे, राहुल येलगुंडे, प्रशांत येलगुंडे, विजय सुरवसकर,नितीन शिंदे,वैभव काटकर, दीपक गजधाने,आर्यन जानराव,उमाकांत येलगुंडे, संकेत खांडेकर, नजीर मुलाणी, समाधान शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.