लाच घेताना पंचायत समिती विस्तार अधिकारी रंगेहात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सोलापूर, दि. ३० ऑक्टोबर २०२५लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), सोलापूर घटकाने आज सापळा कारवाई करून श्री. संदिप सुधाकर खरबस (पद – विस्तार अधिकारी, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर) यांना ₹२,०००/- लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, मौजे येळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील १५वा वित्त आयोगांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे ₹१ लाखाचे बील मंजुरीसाठी प्रस्ताव पंचायत समितीत सादर केले होते.

त्या कामाच्या बील रकमेची परवानगी देण्यासाठी संदिप खरबस यांनी ₹२,०००/- लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.या तक्रारीच्या पडताळणीनंतर आज (दि. ३०/१०/२०२५) ACB पथकाने सापळा रचला असता, आरोपी संदिप खरबस यांनी जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर येथे ₹२,०००/- लाच स्वीकारली, आणि त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाच घेताना सापडलेला विस्तार अधिकारी संदीप खरबस हा सदर बझार पोलीस ठाण्याचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर खरबस यांचा मुलगा आहे.
याच पोलीस ठाण्यात खरबस यांचे वडील पोलीस निरीक्षक होते त्याच पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र), अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील, श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत चौगुले (पोलीस उपअधीक्षक), श्री. शैलेश पवार (पोलीस निरीक्षक) आणि त्यांच्या पथकातील अधिकारी यांनी केली.सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास तात्काळ संपर्क साधावा.
📞 संपर्क क्रमांक:१) ०२१७-२३१२६६८२) WhatsApp: ९४०४००१०६४३)
📧 ई-मेल: dyspacbsolapur@gmail.com४) 🌐 www.acbmaharashtra.gov.in५)
📱 ऑनलाईन तक्रार अॅप: www.acbmaharashtra.net.in








