MH13 News Network
पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. रविंद्र चिंचोलकर तर उद्घाटक एस. एम. देशमुख.स्वागताध्यक्षपदी क्रिडा व युवक कल्याण मंञी संजय बनसोडे.
उदगीर येथील रंगकर्णी साहित्य ,कला , क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने २० ऑक्टोबर २०२४ रोजी होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय पञकार साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी आहिल्यादेवी होळकर होळकर विद्यापीठाचे वृतपञ माजी विभाग प्रमुख जेष्ट पञकार डाॅ. रविंद्र चिंचोलकर यांची तर उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री यांची निवड करण्यात आल्याची माहिती मुख्य संयोजक बिभीषन मद्देवाड यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे करण्यात आली.
पहिल्या राज्यस्तरीय पञकार साहित्य संम्मेलनाचे आयोजन २० आक्टोबर रोजी शहरातील रघुकुल मंगल कार्यालयात एक दिवसाचे संम्मेलन पार पडणार आहे.
असा आहे कार्यक्रम..!
रविवारी (ता.२०) रोजी सकाळी ८.३० वाजता भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन संविधान दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून, १०. ३० वाजता मराठी पञकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे वृत्तपत्र विभागाचे प्रमुख तथा जेष्ट पत्रकार डॉ. रवींद्र चिंचोलकर,तर स्वागताध्यक्ष तथा प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय कँबिनेट मंत्री ना. संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत. या समेलनानात परिसंवाद,न्युसलेस कवितेची काव्यमैफील , कविसंम्मेलन, विविध चँनलचे वृतनिवेदक चर्चा सत्रा मध्ये सहभागी होणार असून यावेळी पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय पञकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या सह अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक प्रा.बिभिषण मद्देवाड, सुनिल हावा पाटील, अर्जुन जाधव, श्रीनिवास सोनी, सिद्धार्थ सुर्यवंशी, नागनाथ गुट्टे,सचिन शिवशेट्टे यांच्या कडून सांगण्यात आले.