Saturday, August 30, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पितृत्व चाचणीने (डी. एन. ए.) खोटा ठरला बलात्काराचा आरोप..! निर्दोष मुक्तता

MH13 News by MH13 News
2 months ago
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
ShareShareShare

पितृत्व चाचणीने (डी. एन. ए.) खोटा ठरला बलात्काराचा आरोप


मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुध्द केलेला बलात्काराचा आरोप पितृत्व चाचणी
(डी. एन. ए. टेस्ट) ने खोटा ठरवला आणि त्या निष्पाप तरुणाची बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यांतर्गत केलेल्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली.

खोट्या आरोपामुळे त्या निष्पाप तरुणाला सात महिने तुरुगांत खितपत राहावे लागले होते.

सदर तरुणीने आणखी एका तरुणाविरुध्द पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता ही बाब देखील न्यायालयात तिच्या उलट तपासात उघड झाली.


‘पोक्सो’ कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो, याचे जळजळीत उदाहरण असलेल्या या प्रकरणाची हकीकत अशी की, २०२१-२२ साली मोहोळ तालुक्यातील १७ वर्षे ६ महिने वय असलेली सदर तरुणी बार्शी तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

तिला मासिक पाळी न आल्याने तिच्या आईने तिला बार्शी येथील एका दवाखान्यात तपासण्यासाठी नेले. तेथे तिची सोनोग्राफी तपासणी केली असताना ती १५ आठवड्यांची गरोदर असल्याचे दिसून आले. तिला पुढील तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ही गरोदर मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले. शासकीय रुग्णालयात तिचा कायदेशीर गर्भपात करण्यात आला.

पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब घेतला. सदर जबाबात तिने डिसेंबर २०२१ मध्ये आरोपीने ती महाविद्यालयात गेली असताना तिला तलावाकाठी नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला आणि ही बाब कोणासही न सांगण्याबद्दल दमदाटी दिली.

हा प्रकार वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने सदरची फिर्याद वैराग पोलीस स्टेशनला पुढील तपासासाठी पाठवण्यात आली. सदर फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक झाली.

तपासादरम्यान सदर गर्भ आरोपीपासूनच झाला आहे हे शाबित करण्यासाठी पितृत्व चाचणीसाठी (डीएनए टेस्ट) करण्यासाठी सदर फिर्यादी मुलीसह आरोपीचा रक्ताचा नमुना आणि अर्भकाचे फिमर बोन काढून रासायनिक तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले.

तपास पुर्ण झाल्यानंतर वैराग पोलिसांनी बार्शी सत्र न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.


या खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी, फिर्यादी मुलीची उलट तपासणी घेतली. त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. तिने उलट तपासात कबुली दिली की, २०१९ साली ती गावातील एका तरुणाबरोबर घरामध्ये शरीरसंबंध करीत असताना अचानक तिचे वडील घरी आले व त्यांनी त्या दोघांना रंगेहात पकडले. त्यानंतर तिच्या वडिलांनी त्या तरुणाला मारहाण केली आणि तिला मोहोळ पोलीस ठाण्यात नेऊन त्या तरुणाविरुध्द फिर्याद देण्यास लावली.


आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी आपल्या युक्तीवादात सदर तरुणीच्या उलट तपासात झालेल्या या बाबी, पितृत्व चाचणी अहवाल ( डी. एन. ए. टेस्ट ) , त्या तरुणीची विसंगतपूर्व साक्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.


या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झालटे, ॲड. सिध्देश्वर खंडागळे यांनी काम पाहिले.
पोक्सो बलात्काराच्या खोट्या आरोपावरुन सात महिने विनाकारण कारागृहात बंदिवासात राहावे लागल्यामुळे निर्दोष सुटलेल्या तरुणातर्फे नुकसान भरपाई मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.


सदर तरूणीने तिच्या गावातील तरुणावर केलेला पोस्को बलात्काराचा खटला अद्याप सोलापूर न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे.

Previous Post

Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे भोसले

Related Posts

राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेले २२ कोटींचे रोख बक्षिस खेळाडूंच्या कष्टाला दिलेली दाद – उपमुख्यमंत्री अजित पवार
Blog

राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेले २२ कोटींचे रोख बक्षिस खेळाडूंच्या कष्टाला दिलेली दाद – उपमुख्यमंत्री अजित पवार

30 August 2025
सिंहगड कॉलेज प्राणघातक हल्ला प्रकरणी संजय उपाडे यास जामीन मंजूर
Blog

शेतकरी आत्महत्येस प्रवृत्ती प्रकरणात दोन सावकारांची निर्दोष मुक्तता..

19 August 2025
देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!
Blog

देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!

7 August 2025
वैभव वाघे खून प्रकरण: पुरवणी दोषारोपपत्र दाखल; जेल बदलाचा अर्ज मागे
Blog

वैभव वाघे खून प्रकरण: पुरवणी दोषारोपपत्र दाखल; जेल बदलाचा अर्ज मागे

7 August 2025
नवउद्योजकतेला नवे वारे; पुढील पिढीला दिशा मिळतेय
Blog

नवउद्योजकतेला नवे वारे; पुढील पिढीला दिशा मिळतेय

6 August 2025
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित..
Blog

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित..

29 July 2025
Next Post
विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे  भोसले

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे भोसले

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.