माजी आमदार राजन पाटलांची ‘क्लीन एक्झिट’ मोहोळच्या राजकारणात चर्चेचा विषय..
सोलापूर, दि. २९ ऑक्टोबर
मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्या दोन्ही पुत्रांसह आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. महत्त्वाचे म्हणजे पक्षप्रवेशाच्या आदल्या दिवशीच राजन पाटील यांनी आपल्या राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता.
या प्रवेशावेळी पाटील समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले. माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या दोन पुत्रांच्या प्रवेशामुळे मोहोळ तालुक्याच्या राजकारणात मोठी कलाटणी येणार हे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे पक्षप्रवेशाच्या आदल्या दिवशीच राजन पाटील यांनी राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला. त्यामुळे “सत्ता बदलली की खुर्ची धरून बसणारे” असा टोमणा मारणाऱ्यांना पाटील यांनी थेट प्रत्युत्तर दिल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे सलग तीन टर्म पक्षश्रेष्ठींनी दिलेला आमदार निवडून आणण्याची किमया राजन पाटील यांनी यापूर्वीही कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केलेली आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता राजकारणात यापूर्वीही सक्रिय होतो आणि यापुढेही सक्रिय राहील असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
राजीनामा पत्रात काय आहे?..

राजीनाम्यात पाटील यांनी नमूद केले आहे की, “सदर पद मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून देण्यात आले होते. मी हे पद स्वखुशीने सोडत असून, माझा राजीनामा मंजूर करण्यात यावा,”असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना नम्रपणे कळवले आहे
.हे पत्र सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, समर्थक त्याला “राजकारणातील दुर्मिळ नैतिकतेचा नमुना” म्हणत आहेत. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना पदाचा मोह न ठेवता दिलेला राजीनामा हा पाटील यांच्या ‘क्लीन पॉलिटिक्स’ स्टाईलचा भाग असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Ajinkyarana Rajan Patil CMOMaharashtra Devendra Fadnavis Jaykumar Gore Sachin Kalyanshetti Ravindra Chavan Amit Shah Ajit Pawar NCPSpeaks_Official BJP Maharashtra








