MH 13News Network
श्री समक्का – सारक्का सांप्रदाय संस्थेतर्फे बुधवारपासून जत्रा उत्सव
सोलापूर : श्री समक्का – सारक्का सांप्रदाय संस्थेतर्फे दि. 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जत्रा उत्सवानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे ओम अवंती नगर जवळ विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या वीस वर्षापासून दर दोन वर्षानंतर संस्थेच्या वतीने हा यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. तेलंगणा येथील वरंगल जिल्ह्यातील मेडारम येथे श्री समक्का – सारक्का जत्रा भरविण्यात येते. सोलापूर सह परिसरातील भाविकांना तेलंगणा येथे त्या जत्रेत जायला जमत नाही त्यांच्यासाठी सोय व्हावी म्हणून सोलापुरात ओम आवंती नगर येथे ही यात्रा दर दोन वर्षांनी भरवण्यात येते. यानिमित्त येथे 100 बाय 80 फुटाचा मंडप उभारण्यात येत आहे तसेच देवीचे आसनाचा चबुतरा बांधण्यात आला आहे. बुधवार दि. 21 फेब्रुवारीपासून श्री समक्का – सारक्का पूजा, होमहावन आणि महाप्रसाद वाटप होणार आहे. तसेच दि. 25 फेब्रुवारी रोजी या यात्रेचा सांगता समारंभ होणार आहे, असे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस रामचंद्र जन्नू, चंदुलाल अंबाल, अंबादास यनगंटी, शंकर वंगा, विठ्ठल इमरशेट्टी, मुरलीधर कनकी आदी उपस्थित होते.