MH 13News Network
शहरातील डिजिटल उतरवणे सुरू..!
शिवजयंतीच्या निमित्ताने सोलापूर शहरात अनेक ठिकाणी संस्था, संघटना, मंडळांनी डिजिटल बोर्ड, फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लावलेले आहेत. पोलीस संरक्षणांमध्ये हे फ्लेक्स उतरण्याचे काम आज शनिवारी सायंकाळी जोरात सुरू झाले आहे. मात्र ही कारवाई कायमस्वरूपी राहणार का ? याची चर्चा मंडळांमध्ये होत आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक, ते छत्रपती संभाजी राजे चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक पासून बाळे,जुळे सोलापूर आदी अनेक ठिकाणी विविध शिवजन्मोत्सव मंडळांनी डिजिटल बोर्ड लावून शुभेच्छा दिल्या आहेत.
नूतन पोलीस आयुक्त श्री.एम.राजकुमार यांनी शहरातील काही नागरिकांनी आणि संस्थांनी दिलेल्या निवेदनावर सदरील कार्यवाही केली आहे. परंतु ही कामगिरी कायम राहणार का यामध्ये सातत्य राहणार का.? याची चर्चा मंडळांमध्ये होत आहे.
डिजिटल फ्लेक्स बोर्ड काढल्यामुळे शहरातील जागरूक नागरिकांनी हायसे व्यक्त केले आहे. पोलीस आयुक्तांना त्यांच्या या कामगिरीबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.