MH13NEWS Network
सोलापूर | दि. २७ ऑक्टोबर २०२५महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने “यंत्रमाग कामगारांची दशा आणि यंत्रमाग उद्योजकांची दिशा” या विषयावर २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सोलापूर येथे यंत्रमाग कामगार व उद्योजक यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी दिली.
राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि धोरणात्मक अडचणींमुळे यंत्रमाग उद्योग संकटात सापडला असून, अनेक कारखाने बंद पडले आहेत. कामगारांची संख्यादेखील झपाट्याने घटली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व उद्योग पुन्हा उभा करण्याच्या उद्देशाने हा मेळावा होत आहे.

मेळाव्याचे अध्यक्षस्थान विष्णू कारमपुरी (महाराज) भूषवणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीनिवास चिलवेरी (प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र कामगार सेना) आणि पेंटप्पा गड्डम (अध्यक्ष, यंत्रमाग धारक संघ) उपस्थित राहणार आहेत.
विणकर, कांडी मशीन, हेल्पर, वॉचमन, सफाई कर्मचारी, टॉवेल सफाई, जॉबर, मुनीम, रंगणी, शिलाई, कोम मशीन, रीलींग मशीन आदी सर्व यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनात्मक मेळाव्याला यशस्वी करावे, असे आवाहन विठ्ठल कुराडकर (कार्यालय प्रमुख) आणि रेखा आडकी (प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र कामगार सेना) यांनी केले आहे.
#यंत्रमागउद्योग #सोलापूर #कामगारसेना #विष्णूकारमपुरी #उद्योगविकास #कामगारहक्क #SolapurTextile #MaharashtraIndustry









