MH 13News Network
आज गुरुवारी सकाळी सोलापुरातील दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपची नाराज मंडळी सागर बंगल्यावर गेली. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुभाष देशमुख यांना बदला आणि त्याबद्दल दुसरा कोणताही उमेदवार द्या आम्ही पूर्ण ताकतीने प्रचार करू असा शब्द दिल्याची माहिती शिष्टमंडळातील श्रीशैल हत्तुरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर लगेच ते शिष्टमंडळ भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची मुंबईतील कार्यालयात भेट घेतली.
नेमके काय आहे प्रकरण..!
मध्यंतरी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांच्यासह श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, माजी नगरसेविका राजश्री पाटील बिराजदार, राजश्री चव्हाण, यांनी स्थानिक भूमिपुत्राला विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, हा वाद न मिटता चिघळतच गेला. भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यावरील असलेली नाराजी प्रसार माध्यमांमध्ये उघडपणे व्यक्त झाली.
आज त्याचाच परिपाक म्हणून नाराज गट प्रथम उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आणि त्यानंतर भाजपचे नेते श्रीकांत भारतीय,भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांना भेटला.
त्यामध्ये माजी नगरसेवक श्रीनिवास करली, माजी नगरसेवक अशोक बिराजदार-पाटील,श्रीनिवास बुरुड, वैभव हत्तुरे, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, अनिल चव्हाण, इच्छुक उमेदवार मळसिद्ध मुगळे,सचिन चव्हाण, श्रीशैल (मामा) हत्तुरे, आप्पासाहेब पाटील वडकबाळकर हे उपस्थित होते.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मळसिद्ध मुगळे यांनी यादव यांची भेट झाली असून पार्टी मीटिंगमध्ये हा विषय मांडण्याचे आश्वासन दिले. त्याचसोबत या विषयासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचेही त्यांनी सांगितले असल्याची माहिती दिली आहे.