आषाढी यात्रेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
जिल्हाधिकारी आणि सीईओ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मनाचा मोठेपणा
पंढरपूर, दि. 7 जुलै : आषाढी वारीदरम्यान संतांच्या पालखी मार्गांवर आणि पंढरपूर शहरात वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या उत्कृष्ट सुविधांबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात ‘निर्मल दिंडी’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. याच वेळी सातारा व पुणे जिल्ह्यांसाठीचे सन्मानपत्र विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुंडकुळवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे होते. यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

“पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मनाचा मोठेपणा” — मुख्यमंत्री स्वत: सन्मानासाठी पुढे..!
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्याकडे वेधले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा स्वतः वारकरी फेटा आणि उपरणे घालून विशेष सन्मान केला.

या वेळी पालकमंत्री गोरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत, “या कार्याचे श्रेय केवळ मला नसून जिल्हाधिकारी, सीईओ, सफाई कर्मचारी, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, विभागीय आयुक्त अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना जाते,” असे नमूद करत सर्वांना श्रेय दिले.
प्रशासकीय यंत्रणेचा उल्लेखनीय सहभाग..!

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये:
सचिन सोनकंबळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी
सचिन जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
अविनाश गोडसे, शहानवाज तांबोळी, अधीक्षक
सचिन सोनवणे, संवाद सल्लागार
शंकर बंडगर, क्षमता समन्वयक
अर्चना कणकी, वित्त सल्लागार
महादेव शिंदे, क्षमतावाढ सल्लागार
प्रशांत दबडे, सांडपाणी सल्लागार
सुजाता व तेजस्विनी साबळे, आनंद मोची, रत्नदीप फडतरे यांचा समावेश होता.

सूत्रसंचालन ऐश्वर्या हिब्बारे यांनी केले. प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमामुळे आषाढी यात्रेतील शासकीय सहभागाचे कौतुक सर्वत्र होत आहे. प्रशासन, मंत्रीमंडळ आणि जनतेत यामुळे सकारात्मक संदेश गेला आहे.