‘
आज सकाळपासून सोशल मीडियावर एक चिमुकली सोलापुरातील बस स्टॅन्ड वरून हरवल्याचा मेसेज सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला. सोलापूर शहर पोलीस हद्दीतील फौजदार चावडी मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने पावले उचलली. काही तासातच खाकी वर्दीतील बाप माणूस धावल्यामुळे लेक तिच्या पित्याकडे सुखरूप मिळाली.

आज शुक्रवारी सकाळी सोलापूर बस स्थानकावरून एका पाच वर्षाच्या चिमुकलीला एका अज्ञात महिलेने अपहरण केले असल्याचे निदर्शनाला आले.

सोलापुरातील लक्ष्मण साहेबराव शिंदे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह सोलापूर बस स्टॅन्ड येथे आले होते. यावेळेस एका महिलेने अचानक त्या चिमुकलेला सोबत घेऊन एका बसमधून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून निदर्शनावरून आले. लातूर ते कल्याण बस असल्याची माहिती समोर आली

. सोलापूर शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या महिलेचा आणि मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ही टीम मोहोळ येथील बस स्थानकावर पोहोचली. येथील फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना असे लक्षात आले की सदर महिला ही पुणे रोडवर लहान मुलीला घेऊन गेली आहे.
मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयासमोर या चिमुकलेला सोडून ती महिला पळून गेली. सोलापूर शहर पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढत तात्काळ मोडनिंब येथे धाव घेऊन मुलीला आपल्या ताब्यात घेतले. शुक्रवारी फौजदार चावडी येथे लक्ष्मण शिंदे यांच्याकडे या मुलीला सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिंदे यांचे डोळे पाणावलेले होते.

संपूर्ण जिल्ह्यातून सोलापुरातील फौजदार चावडी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. संवेदनशील आणि तत्परतेने केलेल्या तपासामुळेच पित्याच्या कुशीत लेक विसावली.
सदर कामगिरी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने,दुय्यम पोलीस निरीक्षक श्री तानाजी दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ब.नं.1552 सुधाकर माने, पोलीस कॉ. नं. 292 अजय चव्हाण,पोलीस कॉ. नं. 18 85 अमोल खरटमल पोलीस कॉ. पो.606 सुरज सोनवलकर,पो शि/2102 सिध्देश्वर हरिदास बाबर पो शि/900 विक्रम उध्दव दराडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.