MH13NEWS Network
सोलापूर (प्रतिनिधी) — सोलापूरमधील वैभव वाघे खून प्रकरणात आरोपी समरसेनजीत प्रमोद गायकवाड, संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, आणि सनी निकंबे यांचे नियमित जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी फेटाळले.
घटनेचा संदर्भ असा की,..
सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी आणि पट्टा यासारख्या प्राणघातक हत्यारांनी अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता.
तसेच, पिडीत महिला आणि रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड या जखमींवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.या प्रकरणात यापूर्वी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड आणि त्यांची दोन्ही मुले प्रसेनजीत व हर्षजीत गायकवाड यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते.
त्यानंतर उर्वरित चार आरोपींनी नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.सुनावणीदरम्यान मुळ फिर्यादीतर्फे ॲड. संतोष वि. न्हावकर यांनी फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपींच्या विरोधात यापूर्वी नोंद असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करत जामीनास विरोध दर्शवला.
सरकार पक्षातर्फे ॲड. दत्तूसिंग पवार यांनी युक्तिवाद करताना नमूद केले की आरोपींनी मयतास गाडीवरून पाडून, लोखंडी रॉड आणि फरशीने मारहाण केली आणि संगनमताने खूनाचा कट रचला, असे स्वकृतदर्शनी पुरावे उपलब्ध आहेत.हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व चार आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केले.
या खटल्यात मुळ फिर्यादीतर्फे ॲड. संतोष वि. न्हावकर आणि ॲड. राहुल रुपनर,सरकार पक्षातर्फे ॲड. दत्तूसिंग पवार,तर आरोपीतर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. राज पाटील आणि ॲड. किरण सराटे यांनी काम पाहिले.