MH 13 News Network
245 माढा विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची एक नवी पहाट उगवू पाहतीये..! ‘बदल हवाच’ हे आता नागरिकांनी ठरवले आहे.संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार व सर्वसामान्य नागरिकांसाठी सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती अपक्ष उमेदवार विजयकुमार आडकर यांनी माध्यमांना दिली.
आपण 245 माढा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत असून आपल्या सर्वांचे आशिर्वाद व पाठबळ माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याने वेळात वेळ काढून सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अपक्ष उमेदवार विजयकुमार आडकर यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक,माढा शहर येथे समर्थकांनी आणि हितचिंतकांनी हजर राहावे असे आवाहन आडकर मित्र परिवाराने केले आहे.