Tuesday, July 1, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

MH 13 News by MH 13 News
17 May 2024
in महाराष्ट्र
0
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने काम करत आहे. मतदारांना मतदान करताना सोईचे जावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावांची माहिती व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन मतदारांनी आपली मतदार चिठ्ठी डाऊनलोड करावी आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्याचा मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

मतदारांना त्यांच्या मतदान क्रमांक, मतदान केंद्र, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक याची माहिती घरबसल्या मिळविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाईन अँप आणि https://voters.eci.gov.in/  व https://electoralsearch.eci.gov.in/  या दोन वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना आपल्या मतदार यादीतील नाव व इतर माहिती घेता येईल तसेच मतदार चिठ्ठी सुद्धा डाऊनलोड करता येईल. या मतदार चिठ्ठीची प्रिंट आऊट घेऊन मतदानासाठी जाता येणार आहे. या मतदार चिठ्ठीसोबत भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेली 12 पैकी एक ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

व्होटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App -VHA) – या ॲपलिकेशन द्वारे नागरिकांना मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती  इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.

खालील पायऱ्या फॉलो करून व्होटर हेल्पलाइन मोबाइल ॲपद्वारे व्होटर स्लिप डाउनलोड करू शकता :

पायरी 1: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’ डाउनलोड करावे.

पायरी 2: मतदार सेवा पोर्टल (https://voters.eci.gov.in/ ) या संकेतस्थळावर नोंदणी केली असल्यास तेथे नोंदणीकृत तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा तुम्ही मतदार सेवा वेबसाइटवर नोंदणीकृत नसाल तर ‘नवीन वापरकर्ता’ म्हणून नोंदणी करा आणि ॲपमध्ये लॉग इन करा.

पायरी 3: ‘मतदार यादीत आपले नाव शोधा’ या पर्यायावर क्लिक करा.

पायरी 4: पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘मोबाइलद्वारे शोधा’, ‘बार/क्यूआर कोडद्वारे शोधा’, ‘तपशीलांनुसार शोधा’ किंवा ‘EPIC क्रमांकाद्वारे शोधा’.

पायरी 5: आवश्यक माहिती समाविष्ट करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 6: मतदारांचे तपशील दिसेल. त्या ठिकाणच्या ‘डाउनलोड’ आयकॉनवर क्लिक करा.

वेबपोर्टलवरून ऑनलाईन मतदार चिठ्ठी (व्होटर स्लिप) अशी करा डाउनलोड

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरूनही आपल्याला मतदार चिठ्ठी डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी खालील प्रमाणे स्टेप फॉलो करा.

पायरी 1: भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत https://voters.eci.gov.in/ व https://electoralsearch.eci.gov.in/ वेबसाइटवर लॉग इन करा.

पायरी 2: मुख्यपृष्ठावरील ‘मतदार यादीत शोधा’ (Search in Electoral Roll) टॅबवर क्लिक करा.

पायरी 3: सोबतच्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘तपशीलांनुसार शोधा’, ‘EPIC द्वारे शोधा’ किंवा ‘मोबाईलद्वारे शोधा’.

पायरी 4: आवश्यक माहिती आणि कॅप्चा कोड टाका करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 5: समोर तुमचे मतदार विवरण दिसेल. तुम्ही तुमचे तपशील बरोबर आहेत का ते तपासू शकता.

पायरी 6: मतदार तपशीलाच्या खालील बाजूस ‘मतदार माहिती छापा’ (प्रिंट व्होटर इन्फॉर्मेशन) बटणावर क्लिक करा.

डाऊनलोड झालेली मतदार माहितीची प्रिंट काढून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांची नावे ऑनलाइन मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिले आहेत. या दोन्ही माध्यमातून तुम्ही तुमचा मतदार ओळखपत्र तपशील सहजपणे पाहू शकता. यामध्ये नाव, पत्ता, लोकसभा मतदारसंघाचे नाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता, मतदार यादीमधील भाग क्रमांक व नाव आणि भाग मतदाता क्रमांक याची माहिती नमूद असते. प्रत्येकाला ऑनलाईन माध्यमातून ही मतदार स्लिप डाउनलोड करता येईल.

ठाणे जिल्ह्यातील सजग मतदारांनी आपले मतदार चिठ्ठी घेऊन येत्या 20 मे 2024 रोजी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

०००

Previous Post

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील १२६९ कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

Next Post

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा    

Related Posts

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
Next Post
मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा    

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.