Saturday, May 30, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आमचा आमदार हा ‘वणव्या’मधील ‘गारव्या’सारखा..! जेव्हा भर उन्हातून आलेले..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
आमचा आमदार हा ‘वणव्या’मधील ‘गारव्या’सारखा..! जेव्हा भर उन्हातून आलेले..!
0
SHARES
851
VIEWS
ShareShareShare

MH 13news network

शनिवारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात देव-यज्ञ या संकल्पनेतून जनता दरबार भरला होता. अधिवेशनात सोलापूरकरांसाठी आवाज उठवणारा युवा आमदार हा भर उन्हातून आलेल्या आमच्यासाठी वणव्यामधील गारव्यासारखा अशी भावना व्यक्त केली गेली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी आमदार कोठे हे गेल्या तीन आठवड्यापासून मुंबईत आहेत. सोलापूरकरांसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक मूलभूत प्रश्नांविषयी त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला. याबाबत नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

त्यांच्याकडून अधिवेशनात असताना सुद्धा रोजच्या रोज संपर्क कार्यालयात आलेल्या निवेदनांची दखल घेऊन त्या संदर्भात लवकर पूर्तता होण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केल्या जात होत्या.

शुक्रवारी मुंबईतून निघतानाच आमदार कोठे यांनी शनिवारी कार्यालय प्रमुखाला आणि कार्यकर्त्यांना देव यज्ञ जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले होते.

सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करण्यात आली होती. स्वतःच्या व्हाट्सॲप सह ऑफिशियल फेसबुक पेजवर तसेच इंस्टाग्राम यावर त्यांनी स्टेटस ठेवले. यामुळे अनेक नागरिकांना जनता दरबाराची माहिती मिळाली.

सोलापुरात उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे.त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.साधारण सव्वा अकरा वाजल्यापासून आमदार देवेंद्र कोठे यांच्या कडून नागरिकांचे प्रश्न,समस्या जाणून घेत त्यावर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला जात होता.योग्य त्या सूचना दिल्या जात होत्या. तसेच अनेक नागरिकांना विविध कारणासाठी शिफारस पत्र देत त्यांचे काम लवकर मार्गी लावण्यासाठी यंत्रणा सज्ज केली जात होती.यावेळी मध्य मतदार संघातील नागरिकांसोबत शहर परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

आमदार वणव्यामधील गारव्यासारखा..!

मध्य मतदार संघासोबत, शहर परिसरातील अनेक नागरिक हे आपल्या समस्या मांडण्यासाठी जनता दरबारमध्ये आले होते. सोलापुरात सकाळी आठ पासून उन्हामुळे शरीराची लाहीलाही सुरू होतेय. त्यामुळे सकाळपासूनच शनिवारी संपर्क कार्यालयात मोठी गर्दी पडली होती. आमदार कोठेंचा नागरिकांशी संवाद सुरू होता, कॉल सुरू होते, त्याच वेळी हक्काचा दादा आमच्या प्रश्नांना न्याय देऊ शकतो हा आम्हाला विश्वास आहे, त्यामुळे कितीही ऊन पडले तरी वणव्यामधील गारव्यासारखा आमदार असल्याचे एका तरुणाने म्हटले. याला उपस्थित असलेल्या अनेक जणांनी हसून दाद दिली. त्यामुळे गंभीर असलेले वातावरण एकदम हलके झाले.

जनता दरबार मध्ये लाडक्या बहिणींची उपस्थिती..!

महायुतीच्या यशामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग आहे हे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी कबूल केले आहे. आमदार कोठे यांच्या संपर्क कार्यालयात महिला भगिनींची विशेष उपस्थिती होती. स्वयंरोजगारापासून, शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी आमदार कोठे यांच्याकडे निवेदने सादर केली.

परोपकारी, पवित्र बुद्धीमुळे भारावून गेलो…!

जनता जनार्दनाची, मानवी मूल्य जोपासना करत, सरकार दरबारामध्ये आवाज उठवणारे आमदार देवेंद्र कोठे यांची सेवा अमूल्य आहे. त्यांच्या परोपकारी आणि पवित्र बुद्धीमुळे मी भारावून गेलो आहे. देवयज्ञ या जनता दरबारामध्ये आलेल्या नागरिकांशी त्यांचा संवाद पाहून मला तात्यासाहेबांची आठवण झाली. त्यांच्या कार्यास एक श्री सिद्धेश्वरभक्त म्हणून माझ्या शुभेच्छा.

श्री बसवराज शास्त्री

‘साहेबां’च्या कार्यतत्परतेचा माझ्यापुढे आदर्श..!

माझे पालकत्व घेतलेले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे जेथे असतात त्या ठिकाणी अक्षरशः यात्रेचे स्वरूप येते. शेकडो नागरिक, अधिकारी,नेते विविध समस्या सोडवण्यासाठी ते जेथे असतात त्या ठिकाणी येतात. प्रत्येक निवेदनावर “क्विक डिसिजन ” घेण्याची साहेबांची हातोटी आहे. कार्यतत्परता हे त्यांचे वैशिष्ट्य असून हाच माझ्यासाठी आदर्श आहे. अधिवेशन काळामध्ये कार्यालयातील अपडेट वेळोवेळी मी घेत होतो. मुंबईतून निघालो की सोलापूरला आल्या आल्या सर्वप्रथम नागरिकांना भेटण्याची ओढ असते.

देवेंद्र कोठे, आमदार मध्य मतदार संघ

Tags: CMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant PatilDevendra kothe BJPsolapurSolapur Maharashtraमध्य मतदारसंघ
Previous Post

मुला – मुलींचे वसतिगृह उभारण्याला समाज कल्याण विभागाचे प्राधान्य

Next Post

आम्ही वंचित का..? मोहोळचे शिष्टमंडळ थेट दिल्लीत..! वाचा काय आहे कारण..?

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
आम्ही वंचित का..? मोहोळचे शिष्टमंडळ थेट दिल्लीत..! वाचा काय आहे कारण..?

आम्ही वंचित का..? मोहोळचे शिष्टमंडळ थेट दिल्लीत..! वाचा काय आहे कारण..?

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.